जळगाव – जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढीच्या सभासदांना निवडणुकीपूर्वी दिलेल्या वचननाम्याची पूर्तता म्हणून सभासदांसाठी विविध सवलती देण्याचा निर्णय गस च्या संचालक मंडळाने घेतला असल्याची माहिती सोसायटीचे अध्यक्ष उदय पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेत माहिती देताना अध्यक्ष पाटील यांनी सांगितले की, प्रशासक काळात २२ कर्मचारी सेवानिवृत्त झाले असून त्यांचे उपदानाचे ४ कोटी देणे आहे; मात्र १ कोटी ९५ लाखाचीच तरतूद केली आहे. त्यामुळे तरतूदीत बदल करावे लागणार आहे. मागील पदाधिकाऱ्यांच्या कार्यकाळात दोन वर्षात ६ हजार सभासदांनी राजीनामे दिले आहे. त्यामुळे संभासदसंख्या ३४ हजारापर्यंत आली आहे.
या पत्रकार परिषदेस उपाध्यक्ष रवींद्र सोनवणे, गटनेते अजबसिंग पाटील, ज्ञानेश्वर सोनवणे, महेश पाटील, रागिणी चव्हाण, अजय देशमुख, विश्वास पाटील, एस. एस. पाटील, योगेश इंगळे, मंगेश भोईटे, तज्ज्ञ संचालक जयश्री महाजन, राम पवार, गटाचे कोषाध्यक्ष व्ही. झेड. पाटील, व्यवस्थापक वाल्मिक पाटील उपस्थित होते.
दिली जाणारी सवलत
{जामीन कर्ज व अपंग सभासद कर्ज व्याजदर ९ टक्के. {वर्गणीचे आतील कर्ज व्याजदर ७.५ टक्के. {विशेष कर्ज व्याजदर १०.५ टक्के. {परिषद अॅडव्हान्स कर्ज व्याजदर ११.५ टक्के. {विशेष कर्ज मर्यादा १५ लाखापर्यंत. {सर्व ठेवींवर व्याजदरात अर्धा टक्के वाढ. {सभासद अभिनव ठेव योजनेत ६.७५ टक्के व्याज.
सर्वसाधारण सभेत घेणार मंजूरी
{जनता अपघात विमा संरक्षण मर्यादा १० लाखापर्यंत. {मृत सभासदाला १०० टक्के कर्जमाफी. {मृत व लवादी सभासदांच्या वारसास अोटीएसची संधी. {डीसीपीएस धारकांसाठी विशेष योजना.