जळगाव प्रतिनिधी – खान्देशातील चित्रकार सचिन मुसळे यांच्या ‘रिफ्लेक्शन’ अर्थात ‘प्रतिबिंब’ हे प्रदर्शन १६ मेपासून पी. एन. गाडगीळ ज्वेलर्सच्या आर्ट गॅलरीत सुरू होत आहे.
बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी सायंकाळी ६ वाजता या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन खासदार उन्मेष पाटील, जैन उद्योगसमूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या हस्ते होणार आहे. उद्योजक रजनीकांत कोठारी, संदीप पोतदार आदी उपस्थित राहतील. चित्रकार मुसळे यांच्या चित्रांची एक स्वतंत्र शैली आहे. ती चित्रं पाहणाऱ्या प्रत्येकाच्या मनात घर करते. जळगावकर चित्रप्रेमी आणि नागरिकांसाठी हे प्रदर्शन १६ ते ३० मेपर्यंत सकाळी ११ ते रात्री ८ वाजेपपर्यंत खुले राहणार आहे. मात्र, बुधवारी गॅलरी बंद असेल, असे आयाेजकांनी कळवले आहे.