जळगाव – जळगाव तालुक्यातील चिंचोली गावात एका कंपनीमुळे त्या गावातील नागरिक गेल्या दहा ते पंधरा वर्षा पासून दूषित पाण्यामुळे त्रासलेले असून वारंवार त्याबाबतीत तक्रार करून देखील काहीच उपयोग होत नसल्याने याबाबतीत अधिकाऱ्यांची हात मिळवणी किंवा आर्थिक व्यवहारांमुळे कारवाई करीत नसल्याचे आरोप चिंचोलीत राहणाऱ्या तरुण सागर घुगे यांनी केल असून पर्यावरण विभागाकडे देखील त्या कंपनीची तक्रार निवेदनांद्वारे केली.
याबाबत अधिक माहिती अशी कि, चिंचोली गावातील त्या कंपनीचे दूषित पाणी गावाच्या वाकी नदी मध्ये सोडले जात असल्याने अनेक समस्यांना तोंड द्यावा लागतं आहे . तसेच गावात पिकांचे ही नुकसान होत आहे व अनेक आजारांना आमंत्रण दिले जात असल्याने त्या कंपनी विरुद्ध तक्रार करण्यात आली आहे.