जळगाव प्रतिनिधी । जिल्हा पोलिस दलात विविध पोलिस ठाण्यांमध्ये रिक्त जागा तसेच बदलीच्या प्रतीक्षेत असलेल्या इतर जिल्ह्यांतील ३७ पोलिस अधिकाऱ्यांच्या नेमणुका व पोस्टिंग करण्याचे आदेश पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी शुक्रवारी ६ नोव्हेंबरला दिले.
बदल्यांच्या आदेश
पोलीस अधीक्षकांनी काढलेल्या बदल्यांच्या आदेशानुसार जळगाव शहरातील शनिपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरिक्षक दिपक बिरारी यांची रामानंदनगर पोलीस ठाण्यात बदली झाले आहेत. तर रामांनदनगर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरिक्षक कांचन काळे यांची पैरवी अधिकारी, टीएमसी शाखेत बदली झाली आहे. तसेच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक संदीप पाटील यांची चोपडा शहर पोलीस ठाण्यात बदली झाली आहे.
यासह नशीराबाद, पहूर पोलीस स्टेशन, जामनेर, पारोळा पोलीस स्टेशन यासह इतर ठिकाणच्या अधिकार्यांच्या बदल्या झाल्या आहेत. तर काही बाहेरुन बदलून आलेल्या अधिकार्यांना जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात पदस्थापना देण्यात आली आहे. शहरातील काही अधिकार्यांना पदोन्नतीवर जिल्ह्याअंतर्गत ठाणे देण्यात आले आहे.