जळगाव – ३५ वर्षीय रुग्णाला झटके येत असल्याने त्याची प्रकृती गंभीर झाली, डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात सीटीस्कॅनद्वारे निदान केले असता रुग्णाला इशकेमिक स्ट्रोक आजार जडला होता. येथे निष्णात डॉक्टरांनी केलेले प्रभावी उपचार यामुळे रुग्ण ठणठणीत होवून आनंदाने घरी परतला.
पारोळा येथील रहिवासी असलेला योगेश नाना पाटील या रुग्णाच्या उजव्या हात-पायाला झटके येत होते, झटक्यांचे प्रमाण इतके वाढले की, ते असह्यय होवून उपचारार्थ रुग्ण रुग्णालयात दाखल झाला. अॅडमिट झाल्यावरही रुग्णाला पहिले आठ तासात खूपदा झटके आले. तात्काळ मेंदूचा सीटी स्कॅनही केला असता इष्यामिक स्ट्रोकचे निदान झाले. याप्रसंगी मेडिसीन तज्ञ डॉ.चंद्रेय्या कांते, डॉ.पूजा तन्नीरवार यांनी रुग्णावर उपचार सुरु केले. त्यांना रेसिडेंट डॉ.आदित्य नांदेडकर, डॉ.सुशील लंगडे, डॉ.प्रियंका भालके, इंटर्न रोशनी दोषी, सोनाली गजमल, सिद्धी धिंग्रा यांनी रुग्णाची देखभाल केली. या टिमद्वारे २४ तास रुग्णावर लक्ष ठेवले जात होते.
दोन दिवसातच रुग्ण देऊ लागला प्रतिसाद – डॉ.आदित्य नांदेडकर
ज्यावेळी मेंदूच्या एखाद्या भागाला होणारा रक्तपुरवठा खंडित होतो किंवा कमी होतो तेव्हा मेंदूच्या पेशींना ऑक्सिजन आणि पोषक द्रव्ये मिळण्यापासून रोखले जाते तेव्हा स्ट्रोक होतो. या रुग्णाला स्ट्रोकमधील इष्यामिक या प्रकाराचा स्ट्रोक आला होता. उपचारानंतर दोन दिवसातच रुग्ण औषधोपचारास प्रतिसाद द्यायला लागला. सोबतच फिजीओथेरपीद्वारेही रुग्णावर उपचार करण्यात आले. हळूहळू रुग्णाच्या हाता-पायातील शक्ती वाढली आणि सात दिवसानंतर रुग्ण ठणठणीत झाला असून तो चालू लागला. महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत रुग्णावर उपचार मोफत झाल्याचे रेसिडेंट डॉ.आदित्य नांदेडकर यांनी सांगितले.