यावल प्रतिनिधी – तालुक्यातील कोरपावली येथे दलित वस्तीत सार्वजनिक महिला शौचालयासाठी सहा लाख रुपये रक्कम मंजुर झालेले असून सदरचे बांधकाम हे दलीत वस्तीत न करता दहिगाव रस्त्यावर असलेल्या वाहत्या नाल्यामध्ये सदरचे अनधिकृत बांधकाम फक्त आणि फक्त सरकारी निधी लाटण्यासाठी स्टीमेट प्रमाणे बांधकाम न करता निकृष्ट दर्जाचे काम केलेले दिसून आले.
अशा प्रकारे संबंधीत अधिकाऱ्यांनी संबंधित बांधकामाची चौकशी करण्यात यावी यशी दलित बांधव व गावकऱ्यांनची मागणी होत आहे.