जळगांव – जळगांव येथील के.सी.ई. सोसायटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ मेनेजमेंट अँड रिसर्च येथे व्हर्च्यूअल आंतरराष्ट्रीय परिषद् दि ११ मार्च २०२२ रोजी आयोजित करण्यात आली आहे. या आंतरराष्ट्रीय व्यवसाय आणि संशोधन परिषदेचे उदघाटन सकाळी १० वाजता करण्यात येणार आहे. न्यु नॉर्मलमध्ये व्यवसाय आणि संशोधनातील शाश्वत संकल्पना हो या परीषदेचा प्रमुख विषय आहे.
या परिषदेचे अध्यक्षस्थान डी.टी. पाटील, के.सी.ई.सोसायटी व्यवस्थापन सदस्य हे भुषविणार असून सावित्रीबाई’ पुणे विद्यापीठाचे रजिस्ट्रार प्रा. डॉ. प्रफुल पवार यांच्या हस्ते परिषदेचे उदघाटन होणार आहे. दुबई विद्यापीठाचे इमेरिटस प्रोफेसर डॉ. अनंथ राव हे व्हर्च्यूअल कान्फरन्सच्या माध्यमातुन परिषदेचे प्रमुख बिज भाषण करतील, त्याच प्रमाणे अमेरीकेतील इन्फोसिसचे सिनीअर डायरेक्टर आणि हेड अॅनालिटीक्स अजय उपाध्याय हे मान्यवर पाहणे आहेत. आय.टी. क्षेत्रातील सद्य स्थितीत होणारे बदल यावर केसस्टडी व्दार विश्लेषणात्मक विषयाची मांडणी ते करतील. या परिषदेसाठी देश विदेशातील संशोधकांनी आणि विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला असून त्यांच
संबंधीत विषयातील संशोधनात्मक निबंध इ कॉन्फरन्सव्दारे प्रदर्शित होतील. या परिषदेचा प्रमुख उद्देश, नविन संशोधकांना आणि विद्यार्थ्यांना त्यांचे संशोधनात्मक संकल्पना मांडता यावी हा असून, येणार चांगले संशोधनात्मक निबंध संकलित करून त्यांचे संदर्भिय पुस्तक प्रकाशित करण्यात येईल असे परिषदेच्या अध्यक्षा आणि केसीई आय एम आर च्या संचालिका प्रा. डॉ. शिल्पा बडाळे यांनी सांगीतले.
संस्थेचे प्राध्यापक केसीईचे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे यांच्या मार्गदर्शनाखाली या परिषदेचे नियोजन करीत आहेत. निमंत्रक (कन्व्हेनर) म्हणून प्रा. डॉ. वर्षा पाठक, संगणक विभाग प्रमुख रिसर्च आणि इन्क्युबेशन तसेच प्रा. डॉ. पराग नारखेडे, मैनेजमेंट विभाग, आणि मॅनेजमेंट रिसर्च सेंटरचे प्रमुख हे आहेत. परिषद सचिव म्हणून प्रा. डॉ. अनुपमा चौधरी, मॅनेजमेंट विभाग या काम करीत आहेत. या परिषदेस कवयित्री बहिणाबाई चौधरी उमवि परिसरातील संशोधक व प्राध्यापकांनी हजर राहून परिषदेवा लाभ घ्यावा असे आवाहन परिषदेच्या अध्यक्षा प्रा. डॉ. शिल्पा बेंडाळे यांनी केले आहे. या परिषदेच्या प्रेस कॉन्फरन्स साठी प्रा. डॉ. शिल्पा बेंडाळे, डॉ. वर्षा पाठक, डॉ. पराग नारखेडे व श्री. संदीप केदार उपस्थीत होते.