जळगाव – कुसुंबा येथील श्री स्वामी समर्थ विद्यालया तर्फे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९२व्या जयंतीनिमित्त ३९२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन ढोलताशा, झाज, लेझीम उपक्रम राबवून उत्साहात साजरी केली. कुसुंबा ग्रामपंचायत, कार्यालयापासून ते दत्त मंदिर मिरवणूक काढण्यात आली होती.
शाळेच्या प्रांगणात पाळणा पोवाडे व मर्दानी खेळ सादर
या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री मनोजकुमार पाटील अध्यक्ष ग स सोसायटी जळगाव ,प्रमुख पाहुणे समाधानराव पाटील आर एफ ओ वनक्षेत्र जामनेर ,ग्रामपंचायत सदस्य भुषन पाटील,प्रमोद घुगे मुख्याध्यापिका प्रतिक्षा पाटील मँड्म, दिपाली भदाणे, तनुजा मोती इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीते साठी अविनाश घुगे, कल्पेश साळुंखे, कामिनी पाटील, सुरेखा सावकारे व सर्व शिक्षकांनी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.