जळगाव – मेहरूण स्मशानभूमी रस्त्यावर गळती दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे महापालिकेने शहरातील पाणीपुरवठा एक दिवस पुढे ढकलला आहे. शनिवारी शहरात पाणीपुरवठा ठप्प राहणार असून रविवारी नियमित वेळेत पुरवठा केला जाणार आहे.
वाघूर पाणीपुरवठा याेजनेंतर्गत टाकलेल्या मुख्य जलवाहिनीला गेल्या काही दिवसांपासून मेहरुण स्मशानभूमी रस्त्यावर गळती लागली आहे. त्यामुळे दरराेज पाण्याची नासाडी हाेत आहे. जलवाहिनी दुरूस्तीचे काम शुक्रवारी हाती घेण्यात आले. त्यामुळे शहरात शनिवारी पाणीपुरवठा बंद राहणार असून राेटेशन एक दिवस पुढे ढकलण्यात आले आहे. १९ राेजीचा पाणीपुरवठा २० राेजी केला जाणार आहे, असे शहर अभियंता विलास साेनवणी यांनी कळवले आहे.
रविवारी या भागात हाेणार नियमित पाणीपुरवठा
नटराज टाकी ते चाैघुले मळापर्यंतचा भाग, शनिपेठ, बळीराम पेठ, नवीपेठ, हाैसिंग साेसायटी, शाहुनगर, प्रतापनगर, खडके चाळ, इंद्रप्रस्थनगर, के. सी. पार्क, गेंदालाल मील हुडकाे, भाेईटेनगर, भिकमचंद जैन नगर, जुने गाव, सिंधी काॅलनी, इंडिया गॅरेज, ओंकार नगर, जाेशीपेठ, गणेशवाडी, कासमवाडी, सम्राट काॅलनी, ईश्वर काॅलनी, वर्षा काॅलनी, सुप्रिम काॅलनी, सानेगुरूजी काॅलनी, पार्वतीनगर, शिवरामनगर, यशवंतनगर, श्रध्दा काॅलनी, नंदनवननगर, चर्च राेड, प्रभात काॅलनी, ब्रुकबाॅन्ड काॅलनी, वाघनगर, हरिविठ्ठल नगर, श्रीकृष्ण काॅलनी, गणेश काॅलनी परिसरातील भाग, समता नगर, स्टेट बँक काॅलनी, मेहरूण, मिल्लत नगर.