नाशिक, वृत्तसंस्था । दैवी आवाज अशा शब्दांत ज्यांच्या गायकीचं वर्णन अनेकांनी केलं, त्या देशाच्या गानकोकिळा लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे वार्धक्यानं निधन झाले. त्या 92 वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच देशावर शोककळा पसरली.
दिवंगत लता मंगेशकर यांच्या अस्थींचे विसर्जन आज सकाळी 8 वाजेच्या सुमारास रामकुंडात करण्यात येणार आहे. यावेळी आशा भोसले यांच्यासह कुटुंबीय उपस्थित राहणार आहेत.
लता मंगेशकर यांचा अस्थिकलश भाऊ आणि संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांचा मुलगा आदिनाथ यांच्याकडे दिल्याची माहिती मुंबईचे सहाय्यक महापालिका आयुक्त किरण दिघावकर यांनी माध्यमांना दिली.