Sunday, December 7, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जळगावात २६ वर्षीय विवाहितेची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या

by Divya Jalgaon Team
February 10, 2022
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेल्या नगरसेवकाची आत्महत्या

Hand near the noose on black background. Suicide concept. Hanging because of work stress. Depression of burnout. Terrible life situation.

जळगाव, प्रतिनिधी । शहरातील एका भागातील राहणाऱ्या २६ वर्षीय विवाहितेची राहत्या घरात सायंकाळच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सविस्तर माहिती अशी आहे की, शहरातील पिंप्राळा परिसरातील विजय नगरात राहणाऱ्या पल्लवी महेश पाटील (वय-२६) या विवाहितेने राहत्या घरात बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पल्लवी पाटील ह्या पती महेश हेमलाल पाटील यांच्यासह सासू-सासरे व पाच वर्षाची मुलगी यांच्यासह वास्तव्याला आहे. पती महेश पाटील हे शहरातील दाणाबाजार मार्केट मधील जळगाव पीपल्स बँकेत क्लार्क म्हणून नोकरीला आहे. तर पल्लवी पाटील ह्या राहत्या घरात खाजगी शाळा सुरू करून उदरनिर्वाह करतात. बुधवार ९ फेब्रुवारी रोजी सकाळी पती महेश पाटील हे कामावर निघून गेले. दरम्यान पल्लवी पाटील यांनी घराच्या मागच्या रूममध्ये सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. सुनबाईने आत्महत्या केल्याचे पाहून सासू व सासरे यांनी हंबरडा फोडला होता. शेजारी राहणाऱ्या नागरीकांसह नातेवाईकांनी मृतदेह खाली उतरून तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले होते. यासंदर्भात रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

गुरुवार १० फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. प्राथमिक तपास पोलीस नाईक राजेश चव्हाण करीत आहे. मयत विवाहितेच्या पश्चात पती महेश पाटील, सासू अंजनाबाई, सासरे हेमलाल पाटील आणि पाच वर्षाची मुलगी उर्वशी असा परिवार आहे.

Share post
Previous Post

आजचे राशीभविष्य, गुरुवार, १० फेब्रुवारी २०२२

Next Post

लग्नाचे आमिष दाखवत अमरावती जिल्ह्यातील ३१ वर्षीय तरुणीवर केला अत्याचार

Next Post
32 वर्षीय महिलेवर अमानुषपणे बलात्कार, घटना सीसीटीव्हीत कैद

लग्नाचे आमिष दाखवत अमरावती जिल्ह्यातील ३१ वर्षीय तरुणीवर केला अत्याचार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group