जळगाव, प्रतिनिधी । ४० सदस्य असलेल्या गोवा विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचे ११ उम्मेदवार रिंगणात असून शिवसेना सदर निवडणूक पूर्ण ताकत पनाशी लावून लढत आहे. काही मतदार संघात वातावरण शिवसेनेसाठी पूरक असल्याचे दिसून येत आहे. युवासेना प्रमुख व शिवसेना नेते आदित्य ठाकरे या निवडणुकीवर लक्ष ठेवून आहेत. आदित्य ठाकरे यांच्या आदेशावरून युवासेनेचे निवडक पदाधिकारी यांची कुमक युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वात गोव्यातील विविध विधान सभा क्षेत्रात शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी दाखल झाली आहे.
यात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने व सचिव वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वात जळगावचे युवासैनिक, महाराष्ट्र राज्याचे युवासेना सहसचिव विराज कावडीया यांच्या सह पेडणे विधानसभा क्षेत्रात शिवसेना उम्मेदवर सुभाष केरकर यांच्या साठी घर ते घर जाऊन प्रचार करीत आहे. युवासेनेचे पदाधिकारी विशेषतः गोव्यातील युवकांना भेटून चर्चा करीत आहे. ज्या प्रकारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र सरकार विकास कार्य करीत आहे त्याच प्रकारे गोव्यात शिवसेनेचे आमदार कार्य करतील, असा विश्वास गोयंकरांना युवासैनिक देत आहे.
पेडणे येथे येत्या शुक्रवारी ११ फेब्रुवारी रोजी आदित्य ठाकरे यांची प्रचार सभा आयोजित करण्यात आली आहे. सभेच्या आयोजनाची ठराविक जबाबदारी जळगावच्या युवासैनिकांवर देण्यात आली आहे. जळगावच्या युवासेना टीम मध्ये युवासेना सहसचिव विराज कावडीया, शंतनू नारखेडे, भूषण सोनवणे, प्रीतम शिंदे, राहुल चव्हाण, प्रशांत वाणी यांचा समावेश आहे. शिवसेनेचा खाता या पेडणे मतदार संघातून उघडू शकतो असा अंदाज राजकीय तज्ज्ञ लावत आहे. १४ फेब्रुवारी रोजी गोयेंकर मतदान करून पुढचा सरकार निवडतील.