पाचोरा, प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संकल्पनेतून शरद युवा संवाद यात्रा आज दि.8 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात पार पडली.
राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या नेतृत्वात शरद युवा संवाद यात्रा संपूर्ण महाराष्ट्रात सुरु करण्यात आली आहे. या यात्रेला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड.रवींद्र पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जि.प.सदस्य रवींद्र नाना पाटील, राष्ट्रवादी पक्षाच्या जिल्हा महिला अध्यक्ष वंदना चौधरी, माजी आमदार दिलीप वाघ यांच्यासह जिल्ह्यातील आणि तालुक्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रवादी पक्षाचे सर्व युवक, कार्यकर्ते, बूथप्रमुख, बूथ कार्यकर्ते, युवती, महिला तसेच सर्व फ्रंटचे प्रमुख पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, सर्व सहकारी संस्थांचे राष्ट्रवादी काँग्रेस युवक, प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख, जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील, माजी आ. दिलीप वाघ, न.पा.गटनेते संजय वाघ, विधानसभा क्षेत्र प्रमुख नितीन तावडे, रा.काँ.जिल्हा उपाध्यक्ष शालिग्राम मालकर, पंचायत समिती सदस्य ललित वाघ, अल्पसंख्याक आघाडीचे अजहर खान, पी.टी.सी.चे व्हाईस चेअरमन विलास जोशी, नगरसेवक भूषण वाघ, विकास पाटील, अशोक मोरे, बशीर बागवान, प्रकाश पाटील, दत्ता बोरसे, नाना देवरे, सिताराम पाटील, बाजार समितीचे प्रशासक रणजीत पाटील, प्रा. माणिक पाटील, सत्तार मिस्तरी उपस्थित होते.