जळगाव, प्रतिनिधी । इकरा एज्युकेशन कॉम्प्लेक्स येथे इकरा वैद्यकीय महाविद्यालय, डी एड कॉलेज, बी.एड कॉलेज व इकरा पब्लिक स्कूलतर्फे भारतरत्न लता मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे.
आज दिनांक ७ रोजी इकरा एज्युकेशन कॉम्प्लेक्स येथे इकरा शिक्षण संस्था संचलित इकरा वैद्यकीय महाविद्यालय,डी एड कॉलेज, b.ed कॉलेज व इकरा पब्लिक स्कूलतर्फे भारतरत्न लता मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. लता मंगेशकर हे एक युग संपले आहे, त्यानी आजअमर असे गीत गायले आहे. आवाज ही मेरी पहचान है असे थे नेहमी म्हणत लता मंगेशकर भारताची कोकीळा संबोधले जाते. तसेच राज्य शासनाकडुन दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. या शोकसभेत इकरा वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रा. डॉ. अब्दुल कुद्दुस यांनी श्रद्धांजली वाहिली, या कार्यक्रमात वैद्यकीय महाविद्यालयातर्फे अशोक बारी, काशिनाथ बडगुजर, मुश्ताक शेख, शिक्षक व इतर शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सोबत इकरा डीएड कॉलेज तर्फे शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. इकरा b.ed कॉलेजचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. इकरा पब्लिक स्कूलतर्फे प्राचार्य जमीर उद्दीन,वाजीद पठाण, मोहसीन, आलम शेख, आरीफ आदी उपस्थित होते. या शोकसभेला उपस्थित मान्यवरांचा डॉ. शेख शोएब यांनी आभार मानले.