जळगाव, प्रतिनिधी । अनेक अडचणींवर मात करून जिल्हा परिषदेच्या शाळा आगेकूच करत असून दर्जेदार ज्ञानदानाचे काम करत आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळांमुळेच मराठी भाषा टिकून असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. पालकमंत्र्यांच्या हस्ते तालुक्यातील नांद्रा येथील जि.प. शाळेला संगणक प्रदान करण्यात आला याप्रसंगी ते बोलत होते. दरम्यान, यासोबतच आज नांद्रा येथे मोतीबिंदू तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. यात १७२ जणांची तपासणी करण्यात आली असून ४४ स्त्री-पुरूषांवर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
कुमारी क्रिशा हेमंत आगीवाल या बालिकेच्या वाढदिवसानिमित्त नांद्रा जिल्हा परिषद शाळेला संगणक भेट देण्यात आला. याप्रसंगी बोलतांना ना. गुलाबराव पाटील यांनी क्रिशाचे व तिच्या आई वडिलांचे मन:पूर्वक कौतुक केले. आमदार निधीतून जिल्हा परिषद शाळेच्या परिसरेत पेव्हींग ब्लॉक बसविण्यात येतील अशी ग्वाही त्यांनी दिली. तर मातोश्री ग्रामसमृध्दी शेत-पाणंद रस्त्यांच्या माध्यमातून परिसरातील रस्त्यांची कामे मार्गी लावण्यात येतील आणि जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून नांद्रा येथील ग्रामपंचायतीची नूतन इमारत उभारण्यात येणार असल्याचे आश्वासन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी दिले. परिसरातील सर्व महत्वाच्या विकासकामांना गती मिळाली असल्याचे ना. गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी नमूद केले.
याच कार्यक्रमात राज्य पात्रता परीक्षा म्हणजेच सेटमध्ये यश संपादन केलेल्या किरण सुधाकर गोसावी, डॉ. के. बी. पाटील यांचा तर सी.ए. असोसिएशनमध्ये निवड झाल्यामुळे सी.ए हितेश आगीवाल यांचा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सत्कार देखील करण्यात आला.
दोन्ही चिमुकल्यांचे पालकमंत्र्यांनी केले कौतुक
कुमारी क्रिशा हेमंत आगीवाल या बालिकेने वाढदिवसानिमित्त कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन न करता या पैशांमधून शाळेला संगणक भेट दिल्याने पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी तिचे आणि तिच्या पालकांचे कौतुक केले. तर जि. प. शाळेत इयत्ता चौथीमध्ये शिकणार्या रोशनी भरत वाघ या बालिकेने ना. गुलाबराव पाटील यांना सरप्राईज गिफ्ट म्हणून श्री गणेशाची मूर्ती भेट दिली. पालकमंत्र्यांनी या भेटीचा प्रेमपूर्वक स्वीकार करून तिचे तोंड भरून कौतुक केले.
तालुक्यातील नांद्रा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते संगणक प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र चव्हाण , कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती कैलास चौधरी , उपसभापती सुरेश पाटील, माजी सभापती लक्ष्मण पाटील, संचालक अनिल भोळे, युवासेना सहसचिव विराज कावडीया, जळगाव देखरेख संघ माजी चेअरमन किशोर आगीवाल, ग्रामपंचायत सरपंच पती कैलास पाटील, उपसरपंच पती पंकज सोनवणे, सदस्य निलेश वाघ , सुनील सोनवणे, एकनाथ सोनवणे मनोज सोनवणे, गणेश सोनवणे , विजय बाविस्कर , प्रकाश सोनवणे , समाधान पाटील , मनोज पाटील, चुडामन वाघ, पितांबर सपकाळे , सुरेश सोनवणे जयराम सोनवणे , भाऊसाहेब पाटील , अशोक आण्णा सोनवणे , शांताराम पाटील, डॉ. कमलाकर पाटील, वि.का.सो. चेअरमन अजबराव पाटील, उद्योजक दिलीप आगीवाल, मुख्याध्यापक संजय भालेराव, उपशिक्षक राजेंद्र चव्हाण, सुधाकर पाटील यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद शाळा व हितेश आगीवाल, मुकुंद गोसावी, मुख्याध्यापक संजय भालेराव व शालेय शिक्षक सुधाकर पाटील व उपशिक्षक राजेंद्र चव्हाण आदींनी केले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे उपशिक्षक राजेंद्र चव्हाण यांनी केले प्रास्ताविक मुख्याध्यापक संजय भालेराव यांनी केले तर आभार उपशिक्षक सुधाकर पाटील यांनी मानले.