बुलढाणा, वृत्तसंस्था । बुलढाण्यात कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी राखण्याची जबाबदारी असणाऱ्या पोलीस स्थानकावरच हल्ला केल्याची घटना घडली. याप्रकरणी शेगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी राखण्याची जबाबदारी असणाऱ्या पोलीस स्थानकावरच हल्ला करण्यात आला आहे. जमावाने शेगाव पोलीस ठाण्यात घुसून तोडफोड केली आहे. मध्यरात्री जमावाने थेट पोलीस स्थानकात घुसून तोडफोड करण्यात आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. शेगाव पोलिसांना मध्यरात्री एकच्या सुमारास एका वाढदिवसाच्या पार्टीत डीजे सुरु असल्याची तक्रार प्राप्त झाली होती. यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि डीजे बंद करायला लावला. यानंतर काही वेळातच पोलीस ठाण्यावर ३० जणांचा जमाव धावून गेला. अज्ञातांनी केलेल्या या हल्ल्यात पोलीस ठाण्यातील सामानाची तोडफोड करण्यात आली.
जमावाकडून पोलीस ठाण्यातील फर्निचर, काचांची तोडफोड करण्यात आली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध घेत आहेत. थेट पोलिसांनाच आव्हान देणाऱ्या या समाजकंठकांविरोधात पोलीस काय कारवाई करतात याकडे आता लक्ष लागलं आहे.