धुळे, वृत्तसंस्था । शहरातील एका भागात राहणाऱ्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पतीने व पतीच्या भावाने मिळून दांडक्याने जबर मारहाण करून तरुणाचा खून (Murder) केल्याची धक्कादायक घटना धुळ्यात उघडकीस आली आहे. यासंदर्भात धुळे शहर (police) पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.
संशयीत आरोपी मयूर शार्दूलधुळे शहरातील मिल परिसरात काल सायंकाळी अनैतिक संबंधाच्या वादातून निखिल पाटील या 21 वर्षीय तरुणाचा मयूर शार्दुल नामक तरुणाने तसेच त्याच्या दोन भावांनी जबर मारहाण करीत निखिल पाटील या तरुणाचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. गेल्या अनेक वर्षापासून निखिल पाटील हा मयूर शार्दुल याचा खास मित्र होता. गेले अनेक वर्ष परिसरात दोघांची मैत्री होती. मात्र काही दिवसांपूर्वीच मयूर शार्दुल याला कळले की आपल्या पत्नीसोबत निखिल पाटील यांचे अनैतिक संबंध आहे. याचा डोक्यात राग ठेवून त्याच्या दोघा भावांनी निखिल पाटील याला भेटण्यासाठी बोलावले. त्यावेळेस मयूर शार्दुल याने आपल्या दोघा भावांच्या मदतीने निखिल याला लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली, यानंतर निखिल पाटील याला नातेवाईकांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता निखिल पाटील याला डॉक्टरांनी मयत घोषित केले.
यासंदर्भात (Dhule city) धुळे शहर पोलीसांनी मयूर शार्दुल व त्याच्या दोघं भावाना अटक केली असून, यासंदर्भात धुळे शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.