जळगाव – जिल्हा नियोजन समिती अंतर्गत कोरोना काळात साहित्य खरेदीत मोठ्या प्रमाणात भष्ट्राचार करण्यात आला असून याकाळात खर्च व मान्यतेविषयी सीबीआय चौकशी होवुन संबंधितांवर फौजदारी स्वरुपाची गुन्हे दाखल होवुन कारवाई करण्याची मागणी नियोजन समिती सदस्य माधुरी चंद्रशेखर अत्तरदे यांनी लोकायुक्त यांच्याकडे केली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील जिल्हा नियोजन समितीत सन २०१९ ते आजपर्यंत मोठया प्रमाणात कोरोनासाठी आवश्यक असलेल्या साहित्य खरेदी करतांना कोणत्याही प्रकारची प्रशासकीय नियमांची अंमलबजावणी न करता, दबावापोटी जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी यांनी संगनमताने वेगवेगळया कामांसाठी अंदाजे ४३३ कोटी रुपयांची उधळण केलेली आहे. तसेच जळगाव जिल्ह्यातील पालकमंत्री व इतर यांनी कोरोना सारख्या गंभीर साथीच्या काळात देखील प्रशासकीय यंत्रणला हाताशी धरुन सामान्य जनेतसाठी आवश्यक असलेल्या गरजांचा, यंत्रसामुग्री, व्हेंटीलेटर्स, ऑक्सीजन कॉन्स्ट्रेंटेटर, मास्क खरेदी इतर बरेच साहित्य खरेदी करण्यात आले होते. प्रत्यक्षात व्हेंटिलेटर्स मागणी केलेले व्हेंटिलेटर्स व पुरवठा करण्यात आलेल्या व्हेंटिलेटर्स यामध्ये तफावत आढळुन आलेली असुन याबाबत सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ता यांनी देखील तक्रारी केली होती.
सदर बाबत तक्रारी वाढल्यानंतर सदर प्रकरण पालकमंत्री, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व इतर वरिष्ठ अधिकारी यांनी दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसेच या भ्रष्टाचारामध्ये तत्कालीन व विद्यमान जिल्हाधिकारी जळगाव, मुख्य कार्यकारी अधिकारी जि प जळगाव, जिल्हा शल्यचिकीत्सक सामान्य रुग्णालय जळगाव व जिल्हा आरोग्य अधिकारी जळगाव हे देखील सामील आहेत. सदर प्रकरणाची तात्काळ चौकशी करुन संबंधितांवर गोरगरीब जनतेच्या आशा अपेक्षांवर पाणी फेरल्याने व मेलेल्या लोकांच्या टाळुवरचे लोणी देखील खाल्लेले आहे. या मोठ्या प्रमाणाच्या भ्रष्टाचाराला पालकमंत्री व संबंधित सर्व अधिकारी जवाबदार आहेत तरी सदर बाबत तात्काळ चौकशी न झाल्यास मी माझ्यासकट असंख्य कार्यकर्ते हे सनदशीर मार्गाने आमरण उपोषण करणार असल्याचे या अर्जात म्हटले आहे.