Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

ब्रेक फेल झाल्याने ट्रॅक्टर अपघातात चालकाचा मृत्यू

by Divya Jalgaon Team
February 2, 2022
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
ब्रेक फेल झाल्याने ट्रॅक्टर अपघातात चालकाचा मृत्यू

जळगाव, प्रतिनिधी । आसोदा रेल्वेगेटजवळ आज दुपारच्या सुमारास ट्रॅक्टर चा ब्रेक फेल झाल्याने चालकाचा चाकाखाली दाबून जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.,

ट्रॅक्टरचा ब्रेक फेल झाल्याने झालेल्या अपघातात ट्रॅक्टर चालकाचा चाकाखाली दबून मृत्यू झाल्याची घटना आसोदा रेल्वेगेटजवळ आज दुपारी घडली. यावेळी नातेवाईकांनी जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात एकच गर्दी केली होती. विठ्ठल यशवंत रायसिंग (कोळी) (वय-४५, रा. आसोदा ता.जि.जळगाव) हे कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. ते ट्रक्टर चालक असून ट्रॅक्टर चालवून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. बुधवार २ फेब्रुवारी रोजी विठ्ठल कोळी हे जळगावहून आसोदाकडे रिकामे ट्रॅक्टर घेवून जात होते. त्यावेळी आसोदा रेल्वे गेट बंद होते.

ट्रॅक्टर थांबवून रेल्वे जाण्याची वाट बघत असतांना ट्रॅक्टरचा अचानक ब्रेक फेल झाल्याने त्यांचा ट्रक्टरवरील ताबा सुटला व ते खाली पडले. तेवढ्यात ट्रक्टरचे चाक अंगावरून गेल्याने ट्रक्टर चालक विठ्ठल कोळी यांचा जागीच मृत्‍यू झाला. खासगी वाहनाने मृतदेह जिल्हा शासकीय विद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला आहे. मयताच्या पश्चात आई मिराबाई, पत्नी सरला, बबलू आणि जयवंत हे दोन मुले आणि विवाहित मुलगी दिपाली, सुन असा परिवार आहे. याप्रकरणी पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.,

Share post
Previous Post

राज्य शासनाचे निवृत्ती वेतन व कुटुंब निवृत्ती वेतन धारकांसाठी महत्वाची माहिती

Next Post

एमबीबीएस प्रवेश प्रक्रियेसाठी “शावैम” मध्ये कार्यवाहीला सुरुवात

Next Post
एमबीबीएस प्रवेश प्रक्रियेसाठी “शावैम” मध्ये कार्यवाहीला सुरुवात

एमबीबीएस प्रवेश प्रक्रियेसाठी "शावैम" मध्ये कार्यवाहीला सुरुवात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group