जळगाव, प्रतिनिधी – जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारीपदी अहमदनगर येथील निरंतर शिक्षणाधिकारी नितीन पोपटराव बच्छाव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तत्कालीन शिक्षणाधिकारी बी.जे. पाटील यांची बदली झाल्यानंतर सहा महिन्यांपासून कल्पना चव्हाण या प्रभारी शिक्षणाधिकारी म्हणून कामकाज पाहत होत्या. दरम्यान, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने मंगळवारी परिपत्रक काढून नितीन पोपटराव बच्छाव यांची शिक्षणाधिकारीपदी नियुक्ती केल्याचे अादेश काढले.