मुंबई, वृत्तसंस्था । कोरोना काळात सोने आणि चांदीच्या दरात तेजी दिसून आली. मात्र, लॉकडाऊन उठल्यानंतर सोने आणि चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. सोने दरात चढ-उतार सातत्याने दिसून येत आहेत. दोन दिवसांपूर्वी सोने दरात वाढ दिसून आली. परंतु आज सोने – चांदी दरात घसरण पाहायला मिळत आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात घसरण पाहायला मिळत आहे. याचा परिणाम हा सराफा व्यवसायावर दिसून येत आहे. आंतराष्ट्रीय बाजारात मौल्यवान धातूच्या किंमती तसेच रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत आहे. असे असताना 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत आज 44,900 रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये या मौल्यवान धातूची किंमत 44,900 रुपये प्रति 10 ग्रॅमवरवरच बंद झाली होती. ॠेेव ठर्शीीींपी ुशलीळींश नुसार चांदी 62,000 रुपये प्रति किलोने विकली जात आहे.