जळगाव, प्रतिनिधी । अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघ व बहिणाई बिग्रेडच्या ठाणे जिल्हाध्यक्ष पदी उज्वला जयंत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
आज दि ३० जानेवारी २०२२ रोजी अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघ व बहिणाई ब्रिगेडच्या झालेल्या संयुक्त बैठकीत सर्वानुमते डोंबिवली येथील सामाजिक कार्यकर्त्या ऍडव्हॉकेट सौ. उज्वला जयंत पाटिल यांची बहिणाई ब्रिगेडच्या ठाणे जिल्हाध्यक्ष पदि नियुक्ती करण्यात आली .
अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघाचे प्रदेश अध्यक्ष श्री. प्रदीपभाऊ भोळे व बहिणाई ब्रिगेडच्या प्रदेश उपाध्यक्षा सौ. हर्षाताई बोरोले यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले . याप्रसंगी अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघाचे जिल्हा कार्याध्यक्ष अमोल कोल्हे , बहिणाबाई ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा सुनीता येवले, महानगर अध्यक्षा साधना लोखंडे , महानगर सचिव अनिता पाटिल , हेमंत बोरोले आदी मान्यवर उपस्थित होते . सदर नियुक्ती बद्दल बहिणाई ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा आशाताई कोल्हे, अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघाचे केंद्रीय अध्यक्ष ऍड. प्रकाशराव पाटिल व समाज बांधवानी ऍड. उज्वला पाटील यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.