Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

आ.शिरीष चौधरी यांच्या उपस्थितीत तालुका दक्षता समितीची बैठक संपन्न

by Divya Jalgaon Team
January 30, 2022
in जळगाव, प्रशासन
0
आ.शिरीष चौधरी यांच्या उपस्थितीत तालुका दक्षता समितीची बैठक संपन्न

यावल प्रतिनिधी – येथील तहसीलच्या प्रशासकीय ईमारतीच्या कार्यालयात  यावल रावेर विधानसभेचे आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली तालुका दक्षता समितीची पहीली बैठक पार पडली.

यात नागरीकांना मिळणारे स्वस्त धान्य वितरणासह तालुक्यातील महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यात आली. यावलच्या तहसील कार्यालयात संपन्न झालेल्या या बैठकीत तालुका पातळीवरील दक्षता समितीचे सचिव सदस्य तहसीलदार महेश पवार यांनी समितीचे अध्यक्ष आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांच्यासह समितीच्या सदस्यांचे स्वागत केले.

बैठकीत सविता अरुण लोखंडे, महेंद्र चौधरी, वैशाली चौधरी, सरफराज तडवी, चंद्रकला इंगळे , भोजराज पाटील , मंजुषा सांळुके तसेच फैजपुर नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या दक्षता समितीचे सदस्य प्रिया बेंडाळे , प्रतिभा होले, रामराव मोरे , वसीम तडवी, संजय रल, शेख जफर शेख अजगर , संजय महाजन, यावल नगर परिषद अंतर्गत दक्षता समिती सदस्य सुरेखा शरद कोळी ,देवयानी महाजन, अनिल जंजाळे, संतोष खर्चे, रईसाबी खाटीक , निलेश बेलदार आदी उपस्थित होते.

यावेळी बैठकीत तहसीलदार महेश पवार सर्व सदस्यांना पुरवठा विषयक माहीती व दक्षता समिती सदस्यांना त्यांचे कार्य व कर्तव्य संदर्भातील माहीती दिली. या वेळी आमदार शिरीष चौधरी यांनी धान्य दुकानदारांनी आपली दुकाने सकाळी ३ तास आणी संध्याकाळी ३ तास उघडावी अशी सुचना दिली तसेच शिधापत्रीके वरील मयत व्यक्ति किंवा बाहेरगावी गेलेल्या नागरीकांची नांवे कमी करून गरजवंत लोकांची नांवे वाढवुन धान्य साठा सुरू करावा , काळया बाजारात विकले जाणारे धान्यावर लक्ष ठेवुन सदर गाडयांचे फोटो काढुन तहसीलदार यांना तसेच पोलीस निरिक्षक यांना सुचित करावे अशा सुचना निर्देश केल्यात ,या बैठकीचे सुत्रसंचालन पुरवठा अव्वल कारकुन राजेश भंगाळे यांनी केले. सदर बैठकीस यावलच्या गटविकास अधिकारी नेहा भोसले , तालुका पुरवठा निरिक्षक अंकीता वाघमळे, सकावत तडवी , के.एम . पाटील उपस्थित होते .

Share post
Tags: #Reshan Dhyany Dukan#आमदार शिरीष मधुकरराव चौधरी#तालुका दक्षता समितीYawal
Previous Post

हायवे मृत्युंजय दुत यांना स्ट्रेचर आणि फस्ट एड किट बॉक्स वाटप

Next Post

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे महात्मा गांधीजींना प्रार्थना सभेतून भावांजली

Next Post
गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे महात्मा गांधीजींना प्रार्थना सभेतून भावांजली

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे महात्मा गांधीजींना प्रार्थना सभेतून भावांजली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group