यावल प्रतिनिधी – यावल तालुक्यातील सांगवी खुर्द येथे १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचाराची घटना उघडकीस आली. यामुळे समाजमन सुन्न झाले आहे. या घटनेतील दोषींना फाशीची शिक्षा व्हावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी व काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी शनिवारी पोलिसांना निवेदन दिले.
या खळबळजनक घटनेच्या पार्श्वभूमीवर शनिवारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी यावलचे पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांना निवेदन दिले. त्यात घटनेतील मुख्य संशयित सतीश प्रभाकर धनगर हा सांगवी खुर्द येथील आहे. या मुख्य आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी महिलांनी केली. राष्ट्रवादीच्या तालुका निरीक्षक लता सावकारे, काँग्रेस अनुसूचित जातीच्या जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकला इंगळे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्षा प्रतिभा नीळ, शहराध्यक्ष नीलिमा धांडे, सांगवी खुर्द सरपंच ज्योती कोळी, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष द्वारका पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख ममता आमोदकर, दुर्गा कोळी, चंद्रकला कोळी, मीरा कोळी, रंजना कोळी, सुमन कोळी, कल्पना कोळी, संगीता कोळी, रूख्माबाई कोळी, मंगला कोळी, सुमन कोळी, इंदू कोळी, शोभा कोळी उपस्थित होते.