नवी दिल्ली – भारत बायोटेक या कंपनीने इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च सोबत मिळून ‘कोव्हॅक्सीन’ या लशीची निर्मिती केली आहे. पुढच्या वर्षीच्या दुसऱ्या तिमाहीत म्हणजे मार्चनंतर ही लस बाजारात येईल, अशी चर्चा होती. ‘लस बऱ्यापैकी प्रभावी ठरली आहे’ असे आयसीएमआरच्या वैज्ञानिक रजनी कांत यांनी सांगितले. त्यात कोविड-१९ टास्क फोर्सच्या सदस्य आहेत. भारत सरकारचे पाठबळ लाभलेली स्वदेशी ‘कोव्हॅक्सीन’ लस २०२१ च्या दुसऱ्या तिमाहीत उपलब्ध होईल, अशी चर्चा होती. पण ही लस फेब्रुवारी महिन्यात उपलब्ध होऊ शकते अशी नवी माहिती देण्यात आली आहे.
आयसीएमआरच्या वैज्ञानिक रजनी कांत यांनी माहिती दिली की, पुढच्या वर्षी फेब्रुवारी-मार्चपर्यंत ही लस उपलब्ध होऊ शकते’. तसेच त्यात काही किरकोळ बदल सुचवून ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने भारत बायोटेकला तिसऱ्या फेजच्या चाचणीसाठी परवानगी दिली.
आयसीएमआरच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजी (एनआयव्ही) बीबीआयएलने मिळून कोव्हॅक्सीन लस विकसित केली आहे. या लस निर्मिती प्रकल्पात सहभागी असलेल्या एनआयव्हीने करोनाची लागण झालेल्या पण कुठलीही लक्षणे नसलेल्या रुग्णाच्या शरीरातून करोना व्हायरसचा स्ट्रेन वेगळा काढला. त्यानंतर हा स्ट्रेन मे महिन्यात बीबीआयएलला पाठवून दिला. बीबीआयएलने त्या स्ट्रेनपासून एक निष्क्रिय लस तयार केली. तिसऱ्या फेजमध्ये हजारो लोकांवर कोव्हॅक्सीन लशीच्या चाचण्या करण्यात येतील. भारत बायोटेकने विकसित केलेली कोव्हॅक्सीनची लस ६० टक्के परिणाकारक ठरु शकते.