मुंबई, वृत्तसंस्था । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर 12 नोव्हेंबर रोजी स्पाइन सर्जरी करण्यात आली होती. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. मात्र आता शिवाजी पार्क मैदानावर प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.
उद्याच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी शिवाजी पार्कवर मुंबई महापालिकेकडून तयारी करण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती पाहता महापालिकेकडून विशेष दक्षता घेण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती पाहता यंदाचे विधीमंडळ अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री सभागृहात उपस्थित राहतील असे म्हटले जात होते. मात्र, हे अधिवेशन मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत पार पडले होते. विधीमंडळ अधिवेशना दरम्यान कोरोनाबाधित कर्मचारी, आमदार आढळल्याने मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात उपस्थित न राहण्याची विनंती महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली होती, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती.