मुंबई, वृत्तसंस्था । राज्यातील लोककलावंतांसाठी तमाशा सुरू करण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी अखिल भारतीय तमाशा परिषदेचे अध्यक्ष रघुवीर खेडकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली होती. राज्यात तमाशा फड सुरू करण्यासाठी सरकार सकारात्मक असल्याची माहिती रघुवीर खेडकर यांच्याकडून मिळाली होती. यानंतर आता सरकारने राज्यात तमाशा सुरू करण्यासाठी 1 फेब्रुवारीपासून परवानगी दिली आहे. त्यामुळे आता लोककलावंतांनी मोठा दिलासा मिळणार आहे.
अजित पवार यांनी पहिल्या भेटीत लोककलावंतांना राष्ट्रवादी हेल्पलाइन कडून १ कोटी रुपये देण्याचे मान्य केले. प्रत्येकी कलावंताला 3 हजार रुपये देण्याचे शरद पवार यांनी कबूल केले त्यानंतर अजित पवार यांनी 1 फेब्रुवारीपासून तमाशा कार्यक्रमाला परवानगी देत असून त्याच दिवशी आम्ही जीआर काढू असे सांगितले. त्याचप्रमाणे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी देखील समंती दिली. अशा प्रकारे तीन महान व्यक्तींनी लोककलावंतांना मोठा दिलासा दिला, असे अखिल भारतीय तमाशा परिषदेचे अध्यक्ष रघुवीर खेडकर यांनी सांगितले.