Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जळगावातील लेक शिवांगी काळेला प्रधानमंत्री बाल शक्ती पुरस्कार प्रदान

by Divya Jalgaon Team
January 24, 2022
in जळगाव
0
जळगावातील लेक शिवांगी काळेला प्रधानमंत्री बाल शक्ती पुरस्कार प्रदान

जळगाव, प्रतिनिधी । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज देशातील बाल शौर्य विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. ह्या कोरोना सारखी आपत्ती असल्याने हा कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आला. प्रधानमंत्री बालशक्ती पुरस्कार जळगावची साडेसहा वर्षाची लेक शिवांगी काळे हिला प्रदान करण्यात आला आहे.

आपल्या आईला विजेचा धक्का लागला असतांना प्रसंगावधान राखून तिचे प्राण वाचविणार्‍या जळगाव येथील शिवांगी काळे या चिमुकलीला आज प्रधानमंत्री बालशक्ती पुरस्काराने गौरविण्यात आले. ५ जानेवारी २०२१ रोजी एक घटना घडली. शिवांगीची आई घरात बाथरूममध्ये असतांना त्यांना विजेच्या हिटरचा शॉक लागला. यामुळे त्यांच्या तोंडून किंचाळी बाहेर पडले. बाथरूमच्या बाहेर तेव्हा पाच वर्षाची असणारी शिवांगी ही दोन वर्षाच्या आपल्या बहिणीसह होती. या दोन्ही बहिणी आईची अवस्था पाहून घाबरल्या. मात्र शिवांगीने प्रसंगावधान राखून आईला स्पर्श न करता हिटरचे स्वीच बंद केले. यातून तिने आईचे प्राण तर वाचवलेच. पण ती आणि तिच्या बहिणीलादेखील दुर्घटनेपासून वाचविले. यामुळे आज तिला प्रधानमंत्री बालशक्ती पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. आज जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्यासह शिवांगी आणि तिच्या पालकांनी पंतप्रधानांशी संवाद साधला. या कार्यक्रमात तिला गौरविण्यात आले. जळगावच्या या लेकीने बहादूर कार्य करून पुरस्कर मिळवत जिल्ह्याचा नावलौकीक उंचावला आहे. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारचे प्रमाणपत्र देण्यासाठी पहिल्यांदाच ‘ब्लॉक चेन’ टेक्नोलॉजी पद्धतीचा वापर केला गेला आहे.

Share post
Previous Post

अवैध गुटखा विक्री; सहा जणांवर कारवाई

Next Post

आजचे राशीभविष्य, मंगळवार, २५ जानेवारी २०२२

Next Post
आजचे राशीभविष्य, गुरुवार, ४ फेब्रुवारी २०२१

आजचे राशीभविष्य, मंगळवार, २५ जानेवारी २०२२

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group