जळगाव प्रतिनिधी – कोरोनामुळे काही निर्बंध लावण्यात आले आहेत. यात प्रामुख्याने शाळा बंद करण्यात आल्या आहेत; मात्र प्रत्यक्षात कोरोनाची स्थिती गंभीर नसल्याने शाळा सुरू केल्यास हरकत नाही.
मुलांचे शैक्षिणिक नुकसान होत आहे. दारू, हॉटेल, बार सुरू असतानाच फक्त शिक्षणच बंद ठेवल्याने शिक्षणाचे भविष्य अंधकारमय होताना दिसून येत आहे. ऑनलाइन शिक्षण हे विद्यार्थ्यांसाठी घातक असल्याने गुरुवारी सकाळी १०.३० वाजता माजी मंत्री गिरीश महाजन, भाजप जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे, महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी व भाजप जिल्हाध्यक्ष शिक्षक आघाडी प्रवीण जाधव यांच्यातर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे.