जळगाव प्रतिनिधी – स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानच्यावतीने 20 व्या अर्थात द्विदशकपूर्ती बालगंधर्व महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी मुंबई येथील श्रीरंग भावे, धनंजय म्हसकर, वेदश्री ओक यांच्या मर्म बंधातली ठेव ही… या नाट्यसंगीताच्या मैफलीने जळगावकर रसिकांच्या हृदयात आनंदोत्सव जागवला. नाट्यसंगीताच्या कलाकृतीच्या सादरीकरणाने बालगंधर्व महोत्सवाची उंची वेगळ्या उंचीवर गेली.
बालगंधर्वच्या दुसऱ्या दिवसाच्या नाट्यसंगीत मैफलीला पंचतुंड नररूंडमालधर, शाकुंतल या संगीत नाटकातील नांदी आजच्या कार्यक्रमाची बहारदार सुरवात झाली. या कार्यक्रमाचे निरूपन सुसंवादिका दिप्ती भागवत यांनी केले. मराठी रंगभुमी ही चिरंजव असून याला वैभवशाली इतिहास आहे. ही रंगभूमी भविष्यातही रसिकांचे मनोरंजन करत राहिल. अशा शब्दात रंगभुमीची आत्मकथा दिप्ती भागवत हिने ऐतिहासिक संदर्भासह सादर केली. यानंतर नाट्य संगिताच्या मुख्य कार्यक्रमाला ‘वद जाऊ कोणाला शरण गं..’ या अजरामर नाट्यसंगीताने वेदश्री ओग हिने सुरवात केली. यानंतर श्रीरंग भावे यांनी महानंदा कादंबरीवर आधारित मत्स्यगंधा नाटकातील गुंतता हृदय हे… हे नाट्यपद सादर केले. तर मानापमान या शं.ना.नवरे यांच्या नाटकातील ‘चंद्रिका ही जणू..’ हे मास्टर दिनानाथ मंगेशकर यांचे सुप्रसिद्ध पद धनंजय म्हसकर यांनी सादर केले. तदनंतर संन्यस्थ खंड्ग या नाटकातील मर्म बंधातली ठेव ही.. हे पद वेदश्री ओक हिने सादर केली. संगीत कुलवधू मधील कितीतरी आतुर प्रेम आपुले हे नाट्यपद श्रीरंग भावे यांनी सादर केले. या पाठोपाठ ययाती आणि देवयानी या नाटकातील अभिषेकी बुवा यांचे हे सुरांनो हे नाट्यपद गायिले. स्वराभिषेक या जितेंद्र अभिषेक यांच्या संग्राहातील दिव्य स्वातंत्र्य रवी ने धनंजय म्हसकर यांनी सादर केले. वसंतराव देशपांडे यांच्या कट्यार काळाजात घुसली या नाटकातील घेई छंद मकरंद हे नाट्यगित सादर केले. नाट्यसंगीत मैफल सादर करणाऱ्या कलावंतांना मकरंद कुंडले, धनंजय पुराणिक, प्रमोद जांभेकर यांनी साथसंगत दिली.