जळगाव – पाळधी धरणगाव तालुक्यातील पाळधीसह परिसरातील चमगाव, चांदसर, शेरी, सोनवद, वाकटुकी, बाभूळगाव, नांदेड, नारणे, अंजनविहीरे शेतीशिवारात गेल्या आठ ते दहा दिवसांत बिबट्याचा वावर असल्याचे समाेर आले आहे. हिंस्त्र वन्यप्राण्यांचा धाेका ओळखून कृषीपंपांना रात्री नव्हे तर दिवसा वीजपुरवठा सुरू करावा, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील, धरणगाव पंचायत समितीचे माजी सभापती मुकुंद नन्नवरे, चांदसरचे लोकनियुक्त सरपंच सचिन पवार, जीवा सेना तालुका उपाध्यक्ष गोपाल सोनवणे, भूषण महाजन, समाधान वाघ, किशोर पाटील, भय्या पाटील यांनी महावितरणचे धरणगाव येथील कार्यकारी अभियंता कार्यालयात कडुबा कोळी यांना निवेदन दिले.