Thursday, February 19, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

मारवेल कॅफेवर कारवाईचे वृत्त प्रसारीत करणार्‍या जेष्ठ पत्रकारांना धमकी

कारवाईसाठी पत्रकारांचे पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे यांना निवेदन

by Divya Jalgaon Team
December 27, 2021
in जळगाव
0
मारवेल कॅफेवर कारवाईचे वृत्त प्रसारीत करणार्‍या जेष्ठ पत्रकारांना धमकी

जळगाव – शहरातील गणपती नगर रस्त्यावर असलेल्या मार्वल कॅ फेवर पोलिसांची कारवाई केल्याची बातमीचे वृत्त हटवावे अशी अन्यथा कारवाई करण्यात येईल अशी धमकी फोनवरुन दोन जणांनी इंडिया आपतक चॅनल जेष्ठ पत्रकार आनंद शर्मा यांना दिल्याचा प्रकार समोर आला आहे. धमकी देणार्‍या संबंधितांवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन सर्व पत्रकारांनी सोमवार, २७ डिसेंबर रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांना दिले आहे.

शहरातील गणपती नगर रस्त्यावर असलेल्या मार्वल कॅ फेत प्रेमीयुगलांसाठी विशेष व्यवस्था असून त्याठिकाणी अश्लील चाळे चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सहाय्यक अधीक्षक कुमार चिंथा यांच्यासह पथकाने त्याठिकाणी छापा टाकून कारवाई केली. कॅ फेत दोन युगल देखील मिळून आले. संबंधित क फे चालकावर कारवाई देखील करण्यात आली. संबंधित प्रकरणाची माहिती आणि अधिकार्‍यांची प्रतिक्रिया असलेले वृत्त इंडिया आपतक चॅनलने प्रसारित केले होते. तदनंतर संपादक आनंद शर्मा यांना सदर व्हिडीओ वृत्त हटविणे संदर्भात किंवा कारवाई करण्याची धमकी देणारे दोन फोन मोबाईल क्रमांक +९१८८०६३०१५०० (पहिला फोन) व +९१८८५६०६१३२२ (दुसरा फोन) यावरून आले होते. पत्रकार लोकशाहीचा चौथा स्तंभ असून पोलीस अधिकार्‍यांनी दिलेल्या बातमीच्या आधारे ते वृत्त प्रसारित करण्यात आले होते. ज्या नंबर वरून पत्रकारांना धमक्या देण्यात आले त्या फोन क्रमांकांची तसेच व्यक्तींची सखोल चौकशी करून संबंधित कॅफे चालक-मालक यांच्यावर कठोर कारवाई करावी असे निवेदनात नमूद आहे. निवेदन देतेवेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ अध्यक्ष प्रवीण सपकाळे, जळगाव शहराध्यक्ष कमलेश देवरे, चंद्रशेखर नेवे, वाल्मिक जोशी, जकी अहमद, विजय वाघमारे, विजय पाटील, जुगल पाटील, बंटी थोरात, वाहेद काकर, धर्मेंद्र राजपूत, वसीम खान, चेतन वाणी, जितेंद्र कोतवाल, अय्याज मोहसीन, रजनीकांत पाटील, अनिल केराले, किशोर पाटील, भूषण हंसकर आदी पत्रकार उपस्थित होते.

Share post
Previous Post

चाळीसगावचे आ. मंगेश चव्हाण यांच्या हटके आंदोलनाने वेधले विधानसभेचे लक्ष

Next Post

मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनात जळगाव जिल्ह्यातील ५०० कोरोना योद्धा सहभागी होणार

Next Post

मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनात जळगाव जिल्ह्यातील ५०० कोरोना योद्धा सहभागी होणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group