भुसावळ – केंद्रीय शिक्षा मंत्रालय अंतर्गत राष्ट्रीय पुस्तक न्यास ने ” आझादी का अमृत महोत्सव” कार्यक्रमाच्या अनुषंगाने पीएम युवा मेंटरशिप योजना नुसार ” भारताचे राष्ट्रीय आंदोल ” विषयावर आयोजित स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला . यास्पर्धेत ३० वर्ष वयापेक्षा कमी वय असलेल्या लेखकांनाच सहभागी होता आले. ७५ युवा लेखकांना छात्रवृत्तीसह मेंटरशिप योजनेसाठी निवडण्यात आले.या ७५ युवा लेखकांमध्ये ४ मराठी भाषिक असून त्यात भुसावळ येथील” प्रवीण नायसे ” यांचा समावेश आहे.
या स्पर्धेत २२ भाषा आणि इंग्रजी सह १६ हजार प्रवेशिका आल्या होत्या त्यात काहि भारतीय प्रवाशांच्या पण प्रवेशिका सहभागी होत्या . त्या सर्व प्रवेशिका तज्ञ कडून वाचन करण्यात येउन तीन स्तरांवर तपासुन घेण्यात आल्या.
३१ जानेवारी २०२१ प्रधानमंत्री मोदी यांनी युवकांना स्वातंत्र्य सेनानी ,त्यांच्याशी संबंधीत घटना, स्वातंत्र्य लढ्यात आपल्या परिसरातील गोष्टी लिहण्याचे आवाहन केले होते . यानंतर युवा लेखकांसाठी पीएम युवा मेंटरशिप योजना शिक्षा मंत्रालय भारत सरकारने राष्ट्रीय पुस्तक न्यास भारत सोबत सुरू केली.
यात निवड झालेल्या ७५ लेखकांमध्ये ३८ पुरुष व ३७ माहिला आहे. यात २ लेखक १५ वर्षेपेक्षा कमी वयाचे आहेत. १६ लेखक १५ ते २० वयाचे आहेत, ३२ युवा लेखक २१ ते २५ वयाचे आहेत आणि २५ लेखक हे २६ ते ३० वयाचे आहेत.
निवड झालेल्या लेखकांना ६ महिन्यांच्या मेंटरशिप कार्यक्रमात सहभागी व्हायचे आहे. यात त्यांच्या पुस्तक प्रस्तावला पुस्तकात रूपांतर प्रक्रिया होइल . यासाठी प्रसिद्ध लेखक,राष्ट्रीय पुस्तक न्यास व भारतातील संपादक टिमचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभणार आहे. याद्वारे युवा लेखकांचे पुस्तक प्रकाशित होइल आणि भारतातील अन्य भाषांमध्ये त्या पुस्तकांचे भाषांतर होइल .
या निवड झालेल्या ७५ युवा लेखकांना सहा महिने दर महा ५० हजार रुपये छात्रवृत्ती मिळेल तसेच पुस्तक प्रकाशननंतर १० टक्के रॉयल्टि मिळणार असून
ध्रुव सचिन पटवर्धन ,श्रेयस राजेश कोल्हटकर,प्रवीण प्रल्हाद नायसे व कीर्ती गंगाधर फटे या चार मराठी युवा लेखकांची झाली निवड आहे.