जळगाव, प्रतिनिधी । नुकतेच काही दिवसापूर्वी कर्नाटकची राजधानी बंगळुरुमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती. मराठा सेवा संघ जळगांव जिल्हा व महानगर यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे.
कर्नाटक राज्यातील बंगलोर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या गुंडांचा आम्ही तीव्र निषेध करतो. तसेच जगातील व भारतातील सर्व शिवप्रेमींच्या मागे मराठा सेवा संघ ठामपणे उभा आहे, असं महानगर अध्यक्ष हिरामणराव चव्हाण यांनी म्हटले आहे. या घटनेतील समाजकंटक व नराधमांना तात्काळ अटक करुन कठोर शासन करावे व अशी निंदनिय घटना भारतात कुठेही पुन्हा घडणार नाही याची खबरदारी प्रत्येक राज्यशासनासह केंद्र सरकारनेही घ्यावी अशी मागणी मराठा सेवासंघाचे माजी विभागिय अध्यक्ष सुरेन्द्र पाटील, सुरेश पाटील, विभागिय कार्याध्यक्ष राम पवार, जिल्हाध्यक्ष अनिल पाटील, जिल्हा प्रचारक दिनेश कदम, जिल्हा सचिव संजय पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष सुमित पाटील, महानगर अध्यक्ष हिरामणराव चव्हाण, महानगर सचिव चंद्रकांत देसले, सहसचिव सचिन पाटील, महानगर कार्याध्यक्ष हर्षल गरुड, संघटक महेंद्र पाटील, उपाध्यक्ष अमित पाटील, दिनकर मराठे, ज्ञानेश्वर साळूंखे, विजय शिंदे, सचिन पवार व आदि पदाधिकारींनी केली आहे.