Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

अटलजींच्या जयंतीदिनी भाजपाच्यावतीने राज्यभर सुशासन दिनानिमित्त विविध कार्यक्रम

भाजपा जिल्हा अध्यक्ष आ सुरेश भोळे (राजु मामा) यांची माहिती

by Divya Jalgaon Team
December 21, 2021
in जळगाव
0
अटलजींच्या जयंतीदिनी भाजपाच्यावतीने राज्यभर सुशासन दिनानिमित्त विविध कार्यक्रम

जळगाव, प्रतिनिधी । भारतरत्न मा प्रधानमंत्री श्रध्देय अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनी २५ डिसेंबर रोजी भारतीय जनता पार्टीतर्फे सुशासन दिनानिमित्ताने राज्यात मोदी सरकारच्या ७ वर्षांतील कामगिरीची माहिती देणारी व्याख्याने, ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान, ई श्रम कार्ड वितरण असे विविध कार्यक्रम होणार आहेत.

भाजपाचे जिल्हा अध्यक्ष आ सुरेश भोळे व महानगर अध्यक्ष दिपक सुर्यवंशी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्या उपस्थितीत मुंबईत अटलजींच्या पुतळ्याचे अनावरण होणार असल्याचेही आ सुरेश भोळे यांनी पत्रकात म्हटले आहे.

आ सुरेश भोळे व दिपक सुर्यवंशी यांनी पत्रकात म्हटले आहे की, ‘अटलजी ते मोदीजी – सुशासनाचा प्रयास’ या विषयावर विविध क्षेत्रातील नामवंतांची व्याख्याने होणार आहेत. तसेच वकील , डॉक्टर , चार्टर्ड अकाऊंटंट , प्राध्यापक , उद्योजक अशा मंडळींचे मेळावे आयोजित करून मोदी सरकारने घेतलेले जनहिताचे निर्णय , सुशासन संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी टाकलेली पावले याची माहिती दिली जाणार आहे. गेल्या ७ वर्षांत मोदी सरकारने शेतकरी व अन्य समाजघटकांच्या कल्याणासाठी घेतलेल्या निर्णयांची माहिती देणारी पत्रके बूथ स्तरापर्यंत वितरीत केली जाणार आहेत.

या खेरीज बुथवर अटलजींच्या प्रतिमेला अभिवादन , जनसंघापासून काम करणाऱ्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान, अटलजींच्या कवितांचे जाहीर वाचन , महाविद्यालय परिसरात अटलजींच्या जीवनावर निबंध स्पर्धा , चित्रकला स्पर्धा असे कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. महापालिका , नगरपालिका , जिल्हा परिषद , पंचायत समित्यांमध्ये सुशासनाची कल्पना राबविण्यासाठी उपक्रम राबविणाऱ्या भाजपा लोकप्रतिनिधींचा ‘ अटल पुरस्कार ‘ देऊन गौरव केला जाणार आहे. असंघटीत कामगारांसाठी मोदी सरकारने सुरु केलेल्या ई श्रम कार्ड योजनेची माहिती देऊन संबंधितांना ई श्रम कार्ड चे वितरण करणे आदी कार्यक्रमही होणार आहेत , असेही आ सुरेश भोळे (राजु मामा) यांनी पत्रकात नमूद केले आहे.असे जिल्हा प्रसिध्दी प्रमुख जळगाव महानगर मनोज भांडारकर यांनी कळविले आहे

Share post
Previous Post

सदाबहार गीते सादर करत “गीतगंगा २०२१’ ने विद्यार्थी मंत्रमुग्ध ‘

Next Post

आजचे राशीभविष्य, बुधवार, २२ डिसेंबर २०२१

Next Post
आजचे राशीभविष्य, गुरुवार, ४ फेब्रुवारी २०२१

आजचे राशीभविष्य, बुधवार, २२ डिसेंबर २०२१

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group