पाचोरा, प्रतिनिधी । संपूर्ण भारत देशाचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याबद्दल कर्नाटक सरकारचा पाचोरा तालुका शहर शिवसेना युवासेना पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करीत आहोत.
छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण भारतीयांचे आराध्य दैवत आहेत. वर्षांनूवर्ष भारत देशा मोगल सत्तेच्या ताब्यात होता पारतंत्र्यात होता. मोगलांचे राज्य अत्यंत जुलमी होते जनतेची लूट अत्याचार, हिंसाचार,आई बहिणी सुरक्षित नव्हत्या मालमत्तेची लूट व नासधूस सततच व्हायची देवी-देवतांची विटंबना केली जात होती. मायबाप जनता जनार्दनाचे जीवन अंत्यत, हाल-अपेष्टा,दुःख दारिद्र्याने पिचून गेले होते. जनता त्राहि त्राहि झाली होती. त्यांचा वाली कुणीही नव्हता त्याकाळी राष्ट्रमाता जिजाऊंच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने राष्ट्रपुरुष, युगपुरुष जन्माला आला वयाच्या सोळाव्या वर्षी मोगलशाही च्या दिल्ली सिंहासनाच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी लढा उभारला मायबाप जनतेला स्वातंत्र्य करण्याची प्रतिज्ञा घेतली. मोघल सत्तेला नामोहरण केले. कुतुबशाही,आदिलशाही, निजामशाही यांनादेखील वडणी वर आणले शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण केला रयतेची हिंदी स्वराज्य निर्माण केले. परीक्षांपासून देश व राज्य सुरक्षित राहावे अत्याधुनिक आरमाराचनिर्माण केले कारभार सुरळीत चालवावा म्हणून अष्टप्रधान मंडळाची नेमणूक केली रयतेचे राज्य निर्माण करून देशाला राज्याला स्वातंत्र्य मिळवून दिले असा हा युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जर तुम्हाला माहीत नसेल उगाच तुमची जिभ वडवड असेल असेल तर तुम्हाला शिवसेना स्टाईलने धडा शिकवला जाईल माफी मागितली पाहिजे नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार आंदोलन करणार महापुरुषांची विटंबना थांबवा शिवसेना हे कदापि सहन करणार नाही पुढील परिणामांना कर्नाटक सरकार जबाबदार राहील आमच्या भावना शासनदरबारी कळवाव्यात. यावेळी ऍड.अभय शरद पाटील उपजिल्हाप्रमुख ,शरद पाटील शिवसेना तालुकाप्रमुख किशोर बारवकर शिवसेना शहरप्रमुख,बंडू चौधरी शिवसेना शहरप्रमुख, युवानेते सुमित किशोर आप्पा पाटील,उर्मिलाताई शेळके महिला आघाडी शहरप्रमुख,किरणताई पाटील महिला आघाडी शहरप्रमुख,संदीपराजे पाटील युवासेना शहरप्रमुख,मतीन बागवान, ,प्रवीण ब्राह्मणे,बापू हटकर, अनिल सावंत, विशाल डॉन, अक्षय जैन,सागर पाटील,तानाजी पाटील,मयूर महाजन,राहुल पाटील, भैय्या सावळे, भूषण पाटील,दीपक सोनवणे,सोनू परदेशी,आदी शिवसेना व युवासेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी,शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.