जळगाव, (जिमाका) दि. 17 – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी जळगाव विमानतळ येथे आगमन झाले. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, महापौर जयश्रीताई महाजन, आमदार अनिल पाटील, माजीमंत्री एकनाथराव खडसे, माजीमंत्री तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. पंकज आशिया, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी यांनीही उपमुख्यमंत्र्यांचे स्वागत केले.
उपमुख्यमंत्री श्री. पवार हे आज जळगाव जिल्हा नियोजन समितीच्या कामकाजाचा आणि जिल्ह्यातील कोविड परिस्थितीचा आढावा घेणार असून जळगाव जिल्हा दूध संघाच्या नवीन दूध प्रक्रिया प्रकल्पाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर भुसावळ नगरपंचायतीच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पणही होणार आहेत.