Thursday, February 19, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

मेडीकल दुकानदाराची पन्नास हजाराची फसवणूक, अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

by Divya Jalgaon Team
December 14, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
जळगावात पिझ्झ्याबाबत चुकीच्या क्रमांकावर ऑनलाईन तक्रार केल्याची फसवणूक

जळगाव, प्रतिनिधी । मेडिकल दुकानदाराला मोबाईलवर केवायसी करून घेण्याच्या नावाखाली 50 हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्थानकात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील राधाकिसन वाडी येथील मेडीकल दुकानदाराला बीएसएनएल मोबाईल नंबरचे केवायसी करून घेण्याच्या नावाखाली सुमारे ५० हजार रूपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस स्थानकात अज्ञात व्यक्तीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रभाकर वामन कोल्हे (वय ६७, रा. हिरापन्ना आपारमेंट, सिव्हिल हॉस्पिटल जवळ, जळगाव) हे मेडिकल स्टोअर करून आपला उदरनिर्वाह करतात. प्रभाकर कोल्हे सोमवारी १३ डिसेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास मेडिकल दुकानावर असताना त्यांना एका अनोळखी नंबर वरून मेसेज आला. त्यात त्यांना बीएसएनएल कंपनीचा मोबाईलचे केवायसी करून घ्या यासाठी दुसऱ्या क्रमांकावर संपर्क साधा असे सांगितले.

त्यानुसार कोल्हे यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे माहिती भरत गेले. त्यानंतर त्यांना एका ॲप डाऊनलोड करण्यास सांगून ओटीपी मागितला. त्यानंतर त्यांना केवायसीच्या नावाखाली १० रुपयाचे चलन भरण्यास सांगितले. याबाबत त्यांनी त्यांच्या एका बँकेच्या डेबिट कार्डच्या माध्यमातून माहिती भरली. परंतु त्यांच्या खात्यातून १० रुपये वर्ग न होता २४ हजार ५००, २० हजार आणि ५ हजार असे एकुण ४९ हजार ५०० रूपयांचे तीन व्यवहार झाल्याचे समोर आले.

याप्रकरणी प्रभाकर कोल्हे यांनी तातडीने जिल्हापेठ पोलिस ठाण्यात धाव घेऊन याबाबत माहिती दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप चांदुरकर करीत आहे.

Share post
Previous Post

आजचे राशीभविष्य, मंगळवार, १४ डिसेंबर २०२१

Next Post

मन्यारखेड येथील घरफोडीतील संशयित आरोपीला स्थागुशाने केली अटक

Next Post
जळगावात चार तरूणांनी किरकोळ कारणावरून एकाला केली बेदम

मन्यारखेड येथील घरफोडीतील संशयित आरोपीला स्थागुशाने केली अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group