जळगाव – जळगाव शहरातील मेहरूण येथे शनिवारी रात्री (दि.४) ११वा. तरूणावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता त्या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.
मेहरूणमधील पवन उर्फ घातक मुकंदा सोनवणे या तरूणावर सागर खंडारे व विशाल सपकाळे या दोघांनी काही कारणाने सोनवणे याच्यावर तलवारीने प्राणघातक हल्ला केला होता यात तो जखमी झाल्याने त्याला रात्री उशीरा खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज सकाळी ९ च्या दरम्यान त्याचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली असून पोलीस प्रशासनांवर ही यामुळे प्रश्न उपस्थित केला जात आहे.


