मेष:-
भागीदारीतील व्यावसायिकांना फायदा होईल. वैवाहिक समस्या दूर होतील. मुलांसोबत वेळ आनंदात घालवाल. सामाजिक मान सन्मान वाढेल. व्यापार्यांना लाभ संभवतो.
वृषभ:-
किरकोळ इजा संभवते. घरातील लोकांची मने जिंकू शकाल. नवविवाहिताना चांगला दिवस जाईल. कुटुंबासमवेत वेळ मजेत घालवाल. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल.
मिथुन:-
आजचा दिवस संमिश्र जाईल. मुलांची काळजी घ्यावी. काही खर्च आवाक्याबाहेर जाऊ शकतात. प्रेमिकांसाठी सौख्यकारक दिवस. मनमोकळ्या गप्पा मारता येतील.
कर्क:-
कौटुंबिक सौख्य लाभेल. ग्रहमानाची उत्तम साथ लाभेल. तुमच्या तक्रारी दूर केल्या जातील. थोरांचे मार्गदर्शन मिळेल. आवडीची भेट वस्तु मिळेल.
सिंह:-
आजचा दिवस उत्साही असेल. तुमच्यातील आत्मविश्वास वाढीस लागेल. मित्रांसोबत पार्टीचे बेत आखाल. भावंडांशी मनमोकळ्या गप्पा होतील. आतताईपणे वागू नये.
कन्या:-
सामाजिक स्तरावर चांगले परिणाम दिसतील. बोलण्याने लोकांना आकर्षित करू शकाल. व्यवसायात घरातील लोकांचे सहकार्य लाभेल. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ होतील. आवडीचे पदार्थ खायला मिळतील.
तूळ:-
मानसिक चंचलतेला आवर घाला. जोडीदारासोबत खरेदीला जाल. जुने मित्र भेटतील. दिवस मजेत घालवाल. घरगुती कामात उत्साहाने हातभार लावाल.
वृश्चिक:-
मानसिक चंचलता जाणवेल. जुनी गुंतवणूक उपयोगास येईल. महत्त्वाची खरेदी शक्यतो टाळावी. वेळेचा सदुपयोग करावा. दूरदृष्टीकोण बाळगावा.
धनू:-
विविध स्तरातून लाभ होईल. थोरांकडून कौतुकास पात्र व्हाल. मौल्यवान भेटवस्तू मिळेल. वडील भावंडांची भेट होईल. मनातील इच्छा पूर्ण होईल.
मकर:-
दिवस घरात शांततेत जाईल. व्यावसायिक लोक दिवसभर व्यस्त राहतील. जवळचे नातेवाईकांचे आगमन होईल. दिवस आनंदात जाईल. जुन्या गोष्टी उगाळत बसू नका.
कुंभ:-
आजचा दिवस उत्तम जाईल. व्यावसायिक लोक नवीन काम हाती घेऊ शकतात. तज्ञ लोकांचा सल्ला मिळेल. विद्यार्थ्यानी महत्त्वाचे निर्णय आज घेऊ नयेत. वडीलधार्यांशी मतभेद टाळा.
मीन:-
मन काहीसे अस्थिर राहील. अचानक धनलाभाची शक्यता. खाण्या-पिण्याची काळजी घ्यावी. मोहाला बळी पडू नका. मनातील साशंकता दूर करा.