Thursday, February 19, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

हिंस्र प्राण्याच्या हल्ल्यात १० वर्षीय बालक गंभीर जखमी

by Divya Jalgaon Team
December 1, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
हिंस्र प्राण्याच्या हल्ल्यात १० वर्षीय बालक गंभीर जखमी

रावेर, प्रतिनिधी । तालुक्यातील १० वर्षीय बालकावर हिंस्र प्राण्याचा हल्ला केल्याची घटना घडली. याप्रकरणी बालक गंभीर जखमी झाला आहे, त्याच्यावर पाल येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे,

तालुक्यातील पाल भागात कंपार्टमेंटमध्ये शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या १० वर्षीय बालकांवर हिंस्र प्राण्याने प्राणघातक हल्ला केल्याने बालक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. मांजल येथील गुराखी दिपला बारेला आपल्या मित्रासोबत दररोज शेळी व गुरे चारण्यासाठी जात असतो. नेहमीप्रमाणे बुधवार, दि.१ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास शेळी व गुरे चारण्यासाठी वन्यजीव वनहद्दीतील कं.नं. ६१ मध्ये गेला असतांना याठिकाणी दबा धरून बसलेल्या हिंस्र प्राण्याने आधी शेळीवर हल्ला चढवला व त्यानंतर गुराखी दिपला बारेला याच्यावर हल्ला करून नाकावर, तोंडावर, पायावर व पाठीवर गंभीर जखमी केले. याबाबत सोबतच्या गुराख्यानी गावाकडे धाव घेत गावात जाऊन गावकऱ्यांना घडलेलल्या घटनेबाबत सांगितले. गांवकरी घटनास्थळी पोहोचले तोपर्यंत बालकाला गंभीर जखमी करून हिंस्र प्राणी पसार झाला होता. यानंतर वडील माल्या बारेला व ग्रामस्थानी जखमी दिपला बारेला याला दुचाकीवर तत्काळ पाल येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, त्याठिकाणी वैद्यकीय अधिकारी सचिन पाटील यांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार केले. दिपल्या बारेला याच्या दोन्ही हातावर आणि पायावर हिंस्र प्राण्याची नखे लागली असून डोक्याची कवटी फुटलेली असल्याने सिटी स्कँन व पुढील उपचार करण्यासाठी जळगाव येथे रवाना केले असल्याची माहिती वैदकीय अधिकारी सचिन पाटील यांनी दिली..

Share post
Previous Post

जायन्ट्स ग्रुप जळगाव तेजस्विनीचा पदग्रहण सोहळा संपन्न

Next Post

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘कोविड अनुरुप वर्तना’चे पालन करावे – जिल्हाधिकारी

Next Post
आरोग्य सुविधा मुबलक ठेवा – जिल्हाधिकारी अभिजित राऊत

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘कोविड अनुरुप वर्तना’चे पालन करावे - जिल्हाधिकारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group