जामनेर, प्रतिनिधी । तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या वडाळी दिगर प्राथमिक शाळेत २६ नोव्हेंबर रोजी भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी मुख्याध्यापक योगेश काळे अध्यक्षस्थानी होते.
मुख्याध्यापक योगेश काळे यांच्या हस्ते भारतीय संविधानाचे शिल्पकार ,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.उपशिक्षक निलेश भामरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.उपशिक्षक संदिप पाटील यांनी संविधानाची उद्देशिका वाचन करून घेतले.मुख्याध्यापक योगेश काळे यांनी अध्यक्षीय भाषणात भारतीय संविधानाची निर्मिती व महत्त्व याबद्दल सविस्तर विवेचन केले.कार्यक्रम प्रसंगी शालेय शिक्षण विभाग शासन परिपत्रकाप्रमाणे शिक्षक संदिप पाटील यांनी संविधान दिन फलक लेखन करून #MyConstitutionMyPride हा हॅशटॅग वापरत विविध समाजमाध्यमांवर अपलोड केले.उपक्रमासाठी केंद्रप्रमुख रामचंद्र वानखेडे यांचे मार्गदर्शन लाभले.