जळगाव, प्रतिनिधी । शहरातील विविध ठिकाणी मोबाईल हिसकविणारे दोघे चोरट्यांनी आज जिल्हापेठ पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्थानकात संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि 21 रोजी वेळ सायंकाळच्या सुमारास फिर्यादी हितेश प्रशांत बऱ्हाटे रा. मुक्ताईनगर जळगाव हे त्याच्या आईचे मोबाईलला टफन ग्लास लावण्यास गणेश कॉलनी येथे जात असतांना दोन अज्ञात चोरट्यांनी ओप्पो कंपनीचा १२ हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकावून मोटर सायकलवर पळून गेल्याची घटना घडली. त्यानंतर त्यांनीच गायत्री अमरलाल अडवाणी रा. सिंधी कॉलनी यांचा सिंधी कॉलनी येथून मोबाइल हिसकावून पळून गेले होते, तसेच अनुप पवार रा. गणेश कॉलनी यांचा रिंगरोड जळगाव येथून दोघांनी त्यांचा मोबाइल हिसकावून पळून गेल्याची घटना घडली.
जिल्हापेठ पोलीस स्थानकात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, डीवायएसपी चंद्रकांत गवळी, पोलीस उपाअधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली पो नि रामदास वाकोडे, एपीआय महेंद्र वाघमारे, पीएसआय प्रदीप चांदेलकर, हेकॉ. महेंद्र पाटील, हेकॉ फिरोज तडवी, पोना संतोष सोनवणे, पोना सलीम तडवी, पोना गणेश पाटील, पोकॉ योगेश साबळे, पोकॉ. समाधान पाटील, पोकॉ अमित मराठे, पोकॉ विकास पहुरकर यांनी तांत्रिक व गोपनीय खात्रीशीर माहितीवरून आरोपी आकाश संजय पाटील (वय १८) रा. वरणगाव जिजाऊ नगर ह मु कलेक्टर ऑफिस मागे जळगाव, गणेश राजेंद्र शिंदे (वय १८) रा. वाघनगर जळगाव असे दोघांनाही ताब्यात घेतले. पहिल्या फिर्यादीचा मोबाईल हस्तगत करण्यात आला असून नमूद दोन्ही आरोपींना मुगळीकर यांच्या समोर हजर करण्यात आले. दि २५ पर्यंत पीसीआर रिमांड मिळाला असून पीसीआर या कालावधीत नमूद आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्यावरून गुन्ह्यात वापरलेली मीटर सायकल व इतर दोन हिसकावून नेलेले मोबाईल पंचनाम्याप्रमाणे पोलिसांनी जप्त करण्यात आले.
आरोपींनी आणखी किती गुन्हे केलेत याबाबत सखोल चौकशी सुरु आहे. अवघ्या ४८ तासात आरोपीबाबत काही एक माहिती नसतांना आरोपीची नवे हस्तगत केली व दोघांनाही अटक करण्यात आली आहे. त्यांच्या जवळून तिन्ही मोबाईल गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल हस्तगत करण्यात आली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.