जळगाव, प्रतिनिधी । महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ ललित कला भवन जळगांव यांच्या वतीने औद्योगिक वसाहतीतील छबी इलेक्ट्रिकलं कंपनीत तेथील कर्मचाऱ्यांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले. कामगार कल्याण केंद्राच्या वतीने कामगारांसाठी विविध उपक्रम राबविले जातात. त्याचाच भाग म्हणून मोफत नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले.
सदर शिबीर कंपनीचे एमडी छबीराज राणे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले. शिबिराला कामगार कल्याण अधिकारी कुंदन खेडकर, कृती फाउंडेशन कार्याध्यक्ष व पोलीस बिनतारी संदेश विभागाचे अमित माळी, पत्रकार चेतन निंबोळकर, जिल्हा पोलीस दलातील संघपाल तायडे, सुरेश राजपूत, कामगार कल्याण निरीक्षक भानुदास जोशी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सर्व प्रथम आलेल्या मान्यवरांचे स्वागत सत्कार करुन शिबिराचे उदघाटन करण्यात आले. आजच्या धकााधकीच्या जीवनशैलीत अनेकांना मधुमेह, उच्च रक्तदाब यासारख्या आजारांनी ग्रासले आहे. हे आजार झाल्यानंतर त्याचे परिणाम शरीराच्या इतर अवयवांवर होतात. मधुमेहाचा परिणाम सर्वात अगोदर डोळ्यांवर होतो.आपण दररोज डोळ्यांची काळजी घेण्याच्या सवयींचा सराव केल्यास डोळ्याच्या अडचणी सहज टाळता येतात. परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे याच अत्यंत महत्वाच्या सवयींकडे सर्वात जास्त दुर्लक्ष केले जाते. आपले डोळे आपल्या आरोग्याचा एक महत्त्वाचा भाग आहेत. आपल्या डोळ्याचे आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी आणि दृष्टी दृढ ठेवण्यासाठी, आपल्या रोजच्या नित्यकर्माचा भाग असावा त्यासाठी डोळ्यांची निगा व काळजी घेतली पाहिजे. याच अनुषंगाने महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पुढे डोळ्यांचे आजार वाढू नये यासाठी मार्गदर्शन देखील करण्यात आले. या शिबिरात कंपनीतील पुरुष, महिला तसेच जेष्ठांनी उपस्थित राहून नेत्र तपासणीचा लाभ घेतला. सदर शिबिराला कृती फाउंडेशन जळगांव, प्रभाकर पाटील नेत्रालय जळगांव, डॉ. चंदन चौधरी, शांताराम राखुंडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सदर शिबिराचे कामगार कल्याण निरीक्षक भानुदास जोशी यांनी प्रास्ताविक मांडले तर कंपनीचे एमडी छबीराज राणे यांनी आभार मानले. प्रसंगी प्रभाकर पाटील नेत्रालयाचे सहाय्यक मनीषा भारुडे, मदतनीस शैलेंद्र कोळी यांनी परिश्रम घेतले.