जळगाव प्रतिनिधी । मुस्लिम आरक्षण संदर्भात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सोमवार 22 नोव्हेंबर रोजी दुपारी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देण्यात आले.
5 जुलै 2019 रोजी विधान भवनावर मोर्चा काढून न्यायालयाने मान्यता दिलेल्या ५ टक्के मुस्लिम शिक्षणिक आरक्षणाचे तातडीने अंमलबजावणी करावी आणि वंचित बहुजन आघाडीने दिलेले पैगंबर बिल पास करावे या मागणीचे निवेदन देण्यात आले आहे.
या निवेदनाच्या मागणीनुसार न्यायालयाने मान्यता दिलेले ५ टक्के मुस्लिम शैक्षणिक आरक्षण लागू करावे, धार्मिक भावना भडकावून समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. महाराष्ट्र वक्फ बोर्डाच्या वतीने मिळकतीचे वाटप करून खुद्दार हजरत यांना मासिक वेतन सुरू करण्यात यावे, वारकरी मंडळी येतील कीर्तनकार यांना शासनाकडून मासिक वेतन देण्यात यावे, सारथी, बार्टी व महाज्योती प्रमाणे मुस्लिम अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यात यावी. असे निवेदनात नमूद केले आहे. या निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा कार्यालयीन सचिव वैभव शिरपुरे, उपजिल्हाध्यक्ष दिगंबर सोनवणे, जिल्हाध्यक्ष प्रमोद इंगळे दीपक राठोड, डॉ.नारायण अटकोरे, मनोज अडकमोल, संजय शिंदे, गुलाबराव भदाणे, मराव सोनवणे यांच्यासह आदी पदाधिकार्यांच्या स्वाक्षर्या आहेत.