जळगाव, प्रतिनिधी । आज 19 नोव्हेंबर 2021 रोजी जागतिक शौचालय दिन ग्रा.प.मोहाडी ता.जळगाव येथे साजरा करण्यात आला.
यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता दि. रा. लोखंडे, गटविकास अधिकारी जळगाव शशीकांत सोनवणे, मोहाडीचे सरपंच धनंजय सोनवणे, सहाय्यक गट विकास अधिकारी निळकंठ ढाके, समाजशास्त्रञ भिमराव सूरदास, क्षमता बांधणी तञ मनोहर सोनवणे, शिरीष तायडे व विनायक सोनवणे समुह समन्वयक व ग्रामसेवक दिलिप पवार आदी उपस्थित होते.
यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी दि.रा. लोखंडे यांनी १७ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर दरमान्य चालणाऱ्या या विशेष कालावधीत वैयक्तिक, सार्वजनिक, शाळा, अंगणवाडीमधील शौचालयांचा शाश्वत वापर, योग्य देखभाल व दुरुस्ती आणि अनुषंगिक सुविधांच्या उपलब्धतेच्या पूरक ठरणारे उपक्रमाचा यात समावेश असल्या बाबत सांगितले. तसेच सार्वजनिक शौचालयांच्या शाश्वत वापरासाठी, गावातील कार्यरत नळ योजनेद्वारे व अन्य सुकर मार्गाने पाणी तसेच सार्वजनिक शौचालय परिसरात पुरेशी प्रकाश व्यवस्था स्थानिक ग्रामपंचायतीच्या मदतीने या कालावधीत उपलब्ध करावी असे विषद केले. सार्वजनिक शौचालय परिसरामध्ये वा शौचालयाच्या मार्गावर अनावश्यक झाडे झुडपे, वाढलेले गवत, साचलेले सांडपाणी असा सर्व परिसर ग्रामपंचायत व स्थानिक लोकसहभागातून स्वच्छ करणे, गावातील नादुरुस्त सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती संबंधित ग्रामपंचायतीच्या सहकार्याने करणे, शाश्वत हागणदारी मुक्ततेकरीता द्वितीय तपासणीतून प्राप्त होणाऱ्या माहितीवरून एक खड्डा शौचालय असलेल्या कुटुंबांना दोन खड्डा शौचालयामध्ये बांधकाम करणे व कुटुंबस्तर शौचालय परिसर स्वछता व सुशोभीकरण करण्यासाठी प्रवृत्त करून ही बांधकाम करून घेणे आदी उपक्रम राबवावे, असे सांगितले. सूत्रसंचालन मनोहर सोनवणे यांनी केले.