Friday, February 20, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जळगावात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची रेल्वेस्थानक परिसरातून दुचाकी लंपास

by Divya Jalgaon Team
November 19, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
जळगावातील गोलाणी मार्केटमधून दुचाकी लंपास

जळगाव प्रतिनिधी । शहरातील आदर्श नगर येथील रहिवाशी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची रेल्वेस्थानक परिसरातून २० हजार रूपये किंमतीची दुचाकी लांबविल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आदर्श नगर येथील रहिवाशी मधुकर नथ्थू कोळी (वय-६८) हे आपल्या कुटुंबियासह राहतात. ते सेवानिवृत्त कर्मचारी आहे. अमळनेर तालुक्यातील पाडसे येथे त्यांची शेती आहे. मंगळवार १६ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता अमळनेर येथे जाण्यासाठी जळगाव रेल्वे स्थानक परिसरात पार्सल ऑफीस जवळ दुचकी (एमएच १९ बीवाय ४५) ने आले. दुचाकी तिथेच पार्किंग करून ते अमळनेर येथे गावाला गेले. त्यानंतर सायंकाळी ७ वाजता जळगावात आल्यानंतर त्यांना त्यांची पार्किंग केलेली दुचाकी मिळून आली नाही.

परिसरात शोधाशोध केली तरीही मिळाली नाही. दरम्यान शोधाशोध करून दुचाकी मिळाली नसल्याने अखेर गुरूवार १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. मधूकर कोळी यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ योगेश बोरसे करीत आहे.

Share post
Previous Post

वीरजवान मंगलसिंग परदेशी यांच्या कुटुंबीयांचे पालकमंत्र्यांनी केले सांत्वन

Next Post

जामनेर येथे वाहतूक करणाऱ्या गुरांचा ट्रक पहुर पोलिसांनी पकडला

Next Post
जामनेर येथे वाहतूक करणाऱ्या गुरांचा ट्रक पहुर पोलिसांनी पकडला

जामनेर येथे वाहतूक करणाऱ्या गुरांचा ट्रक पहुर पोलिसांनी पकडला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group