Thursday, February 19, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

महापालिकेत करभरणा केल्यास मिळणार मोठी सूट

महापौर महाजनांच्या मागणीला यश; अभय योजना पुन्हा दोन महिन्यांसाठी लागू

by Divya Jalgaon Team
November 13, 2021
in जळगाव, प्रशासन
0
जळगावातील दफनभूमितील अतिक्रमण काढतांना तणाव

जळगाव, प्रतिनिधी । शहरातील करवसुली वाढविण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून मालमत्ता कर भरणा केल्यास शास्तीमध्ये सूट देण्यात येत होती. महापालिका प्रशासनाच्या अभय योजनेला उत्तम प्रतिसाद लाभल्याने योजना पुन्हा कार्यान्वित केली जावी, अशी मागणी करणारे पत्र महापौर जयश्री सुनिल महाजन यांनी महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्याकडे केली होती.

महापौर महाजन यांच्या या मागणीला यश आले असून, अभय योजना जळगावकरांसाठी पुन्हा दोन महिन्यांसाठी लागू करण्यात आली आहे. यासंदर्भात शुक्रवार, 12 नोव्हेंबर 2021 रोजी महापालिका प्रशासनाने तसे आदेशही काढले आहेत.

मालमत्ता कराचा भरणा वाढवून महापालिकेच्या करवसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अभय योजनेंतर्गत जुलै महिन्यापर्यंत सूट देण्यात येत होती. महापालिका प्रशासनाला अभय योजनेत उत्तम प्रतिसाद लाभल्याने योजना पुन्हा कार्यान्वित व्हावी, अशी मागणी करणारे पत्र ऑगस्ट महिन्यात महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी महापालिका आयुक्तांना दिले होते.

महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांच्या या मागणीला यश आले असून, 15 नोव्हेंबर 2021 ते 15 जानेवारी 2022 पर्यंत अभय योजना पुन्हा कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत 15 नोव्हेंबर ते 14 डिसेंबर 2021 पर्यंत करभरणा केल्यास 90 टक्के शास्ती माफी मिळेल. तसेच 15 ते 31 डिसेंबर 2021 दरम्यान कराचा भरणा केल्यास शास्तीत 75 टक्के, तर 1 ते 15 जानेवारी 2022 पर्यंत भरणा केल्यास शास्तीत 50 टक्के सूट दिली जाणार आहे. थकबाकीदारांना सवलत दिल्यास अनेक वर्षांपासूनची थकीत रक्कम महापालिकेला मिळू शकते, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून सलग दुसर्‍या वर्षी ही योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Share post
Previous Post

भाजपाचा दोन दिवसीय प्रशिक्षण शिबीर, माजी मंत्रींच्या उपस्थितीत समारोप

Next Post

आजचे राशीभविष्य, रविवार, १४ नोव्हेंबर २०२१

Next Post
आजचे राशीभविष्य, बुधवार, ३ फेब्रुवारी २०२१

आजचे राशीभविष्य, रविवार, १४ नोव्हेंबर २०२१

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group