Thursday, February 19, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

अवैधपणे घरगुती गॅस भरणाऱ्या रॅकेटचा एमआयडीसी पोलिसांनी केला पर्दाफाश

मशीनसह ६८ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त, दोन जणांना अटक

by Divya Jalgaon Team
November 11, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
अवैधपणे घरगुती गॅस भरणाऱ्या रॅकेटचा एमआयडीसी पोलिसांनी केला पर्दाफाश

जळगाव प्रतिनिधी । अवैधपणे घरगुती गॅस वाहनांमध्ये भरणाऱ्या रॅकेटचा एमआयडीसी पोलीसांनी कारवाई करुन पर्दाफाश केला आहे. कारवाईत रिकामे सिलिंडर, गॅस भरण्याच्या मशीनसह ६८ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन जणांना अटक केली आहे.

एमआयडीसी पोलीसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सिराज खान रज्जाक खान उर्फ शेराखान (वय ३०) रा मास्टर कॉलनी व जहांगीर रफिक पटेल (वय ४४) रा. सदाशिवनगर शेरा चौक अशी अटक केलेल्या दोन्ही संशयितांची नावे आहेत.

मास्टर कॉलनीत जळगाव किराणाच्या मागील बाजूस बेकायदेशीररित्या घरगुती सिलिंडरमधून गॅस वाहनांमध्ये भरून दिल्या जात असल्याची गोपनीय माहिती पोलिस उपअधीक्षक कुमार चिंथा यांना मिळाली. त्यानुसार जिल्हा पोलीस ठाण्याच्या म त्यानुसार चिंता यांनी जिल्हापेठचे सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे, पोलिस नाईक सलीम तडवी, रवींद्र मोतीराया , महेश महाले, समाधान पाटील यांच्या पथकाला कारवाईच्या सूचना केल्या. पथकाने बुधवारी १० नोव्हेंबर रोजी ८.३० वाजता मिळालेल्या माहीतीनुसार मास्टर्स कॉलनीत छापा टाकला. या ठिकाणी एका पत्र्याच्या शेडमध्ये अवैधपणे घरगुती गॅस सिलिंडरमधुन इतर सिलेंडर वाहनांमध्ये गँस भरण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला. पोलिसांनी घटनास्थळावरून सिराज खान रज्जाक खान उर्फ शेराखान (वय ३०) रा मास्टर कॉलनी व जहांगीर रफिक पटेल (वय ४४) रा. सदाशिवनगर शेरा चौक या दोघांना ताब्यात घेतले आहे.

या ठिकाणाहून पथकाने रोख रक्कम १ हजार ९२० रुपये , ८ हजार ४८० रुपयांचे चार भरलेले सिलेंडर , २८ हजार ८०० रुपये किंमतीचे एकुण २४ रिकामे सिलेंडर , १ हजार २०० रुपयांचे १ इंडियन कंपनीचे रिकामे सिलेंडर, १ हजार २०० रुपयांचे १ एच पी कंपनीचे रिकामे सिलेंडर, १५ हजारांचा इलेक्ट्रॉनिक वजन काटा व १२ हजारांचा गँस भरण्याचा पंप असा एकूण ६८ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी सपोनि महेंद्र वाघमारे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share post
Previous Post

तृतीयपंथीयांनी ओळखपत्रासाठी पोर्टलवर नाव नोंदविण्याचे आवाहन

Next Post

गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना

Next Post

गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group