पारोळा, प्रतिनिधी । जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या इतर मागास प्रवर्गातुन माजी पालकमंत्री डॉक्टर सतिष पाटील यांच्या समोर कडवे आवाहन उभे करणारे व इतर संस्था मतदार संघात माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनाही प्रतिस्पर्धी असलेले थोडक्यात जिल्हा बँकेच्या इतिहासात प्रथमच दोन जागांवर एकच उमेदवाराने कडवे आवाहन उभे केलेले हणमंतखेडे ता पारोळा येथील प्रकाश जगन्नाथ पाटील यांचा प्रचार नारळ नागेश्वर महादेव मंदिर येथे जळगाव जागृत जनमंच चे अध्यक्ष शिवराम पाटील यांच्या हस्ते फोडण्यात आले.
यावेळी श्री पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले की दगडी बँक हि शेतकऱ्यांची असल्याने संचालक पण शेतकरीच असला पाहिजे आजी-माजी पालकमंत्री यांचे काय काम आहे त्यामुळे सामान्य शेतकऱ्यांला जिल्ह्यातील मतदारांनी बहुसंख्य मतदान करून धनशक्ती विरोधात जनशक्ती चा विजयी करण्याचा संकल्प करावा असे सांगितले
तसेच कमांडो ईश्वर मोरे यांनी सांगितले की जिल्हा बँकेत शेतकरींना कर्ज दिले पाहिजे परंतु असे न करता फक्त संचालक करोडो रुपये कर्ज घेत असून बँकेचा फायदा शेतकरी वर्गाला होत नाही त्यामुळे आपल्यातला शेतकरी संचालक झाला पाहिजे हे महत्त्वाचे आहे. पुढे डॉ.पृथ्वीराज पाटील यांनी सांगितले की सामान्य कुटुंबातील सामान्य शेतकरी प्रकाश पाटील यांनी जी हिम्मत केली आहे त्यांच्या हिम्मत न्याय मिळवून देण्यासाठी आपल्याला प्रकाश पाटील यांना निवडणूकीत विजयी करणे आवश्यक आहे.
या कार्यक्रमाला शेतकरी संघटेनेचे नेते सुनील देवरे-पाटील,शेतकरी संघटनेचे भडगाव तालुकाध्यक्ष अभीमण हटकर,पाचोरा जागृत जनमंच चे निळकंठ पाटील, शेतकरी नेते उमेश नाना पाटील, राकेश वाघ, काम्रेड अनिल नाटेकर,लक्ष्मण पाटील,मधुकर पाटील, डॉ.उदय पाटील,चंद्रकांत पाटील, प्रल्हाद पाटील, अजाबराव पाटील, एकनाथ पाटील, प्रकाश महाजन,हेमंत पाटील, मनोहर मोरे,संदेश पाटील, भुषण देवरे व शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.